पहिला प्यार कभी भूला नहीं जाता! : दिलीप सोपलांची शरद पवारांना शायरीतून साद

राजकारणात संस्कार जोपासले पाहिजेत. मतभेद जरूर असावेत. पण, वैयक्तिक संबंधही चांगले असावे लागतात.
Sharad pawar_Dilip Sopal
Sharad pawar_Dilip Sopal

बार्शी (जि. सोलापूर) : दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत जाण्याचा माझा निर्णय योग्यच होता अन् तेथे दोन्ही काँग्रेसला आमच्यासोबत यावे लागले आहे. राजकारणात संस्कार जोपासले पाहिजेत. मतभेद जरूर असावेत. पण, वैयक्तिक संबंधही चांगले असावे लागतात. विचार चांगले असावेत. राजकारणात द्वेष नव्हे; तर त्वेष असायला पाहिजे. मी हरलोय; पण थकलो नाही, असा इशारा माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आपल्या विरोधकाला दिला. त्यांचा हा इशारा बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा विषय झाला आहे. (I'm lost; But not tired: Dilip Sopal's warning to opposition)

कोरोना संसर्गाच्या लॉकडाउनमध्ये शिथिलता होताच राजकीय कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील जिल्ह्याची नेतेमंडळी व्यासपीठावर जमली अन् बार्शी नगरपरिषद निवडणुकीत आम्ही एकदिलाने विरोधकास टक्कर देणार आहोत, असे रणशिंगही त्यांनी फुंकले.

Sharad pawar_Dilip Sopal
काही लपवायचं तर, नाही ना? महापालिकेच्या प्रेक्षक गॅलरीत कोल्हेंनी ठोकला चार तास तळ

सोपल यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीमध्ये विरोधकाचा नाव न घेता समाचार घेतला. ते म्हणाले की, बार्शीकरांना ते संस्कार माहित होते. पण, मध्यंतरी त्यात खंड पडला आहे, वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे. वाढती राक्षसी प्रवृत्ती जनतेने लक्षात घेतली पाहिजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टोकाची टीका केली. पण, त्याचे तेवढेच कौतुकही बाळासाहेब करीत होते, त्यामुळे त्यांना कोणीही विसरु शकत नाही.

बार्शी तालुक्यातील जनतेने मला आठ विधानसभा निवडणुकांपैकी सहा निवडणुकींमध्ये सेवा करण्याची संधी दिली आहे. तीस वर्षांपेक्षा जास्त काळ जनतेची वकिली करीत आहे. ‘पहिला प्यार कभी भूला नही जाता,’ असे म्हणून त्यांनी शरद पवारांवर आपले तेवढेच प्रेम असल्याचे सांगून त्यांनी पुन्हा पवारांना साद घातली आहे.

Sharad pawar_Dilip Sopal
'एफआरपी'चे तुकडे केल्यास गाठ 'स्वाभिमानी'शी; रविकांत तुपकरांचा सहकारमंत्र्यांना इशारा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, सोलापूर शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, जिल्हा परिषद सदस्या रेखा राऊत, बार्शीचे शिवसेना शहर प्रमुख दीपक आंधळकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा अॅड. सुप्रिया गुंड पाटील, विक्रम सावळे, योगेश सोपल अशी मंडळी जमली होती, तर राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर,कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील दौरा सुरु असल्याने येऊ शकलो नाहीत, असा निरोप कार्यक्रमावेळी पोच करून आम्ही तुमच्या सोबत असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com