सांगलीत अवैध कॅसिनोत गँगवॉर; व्हिडीओ फुटेज थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाच पाठवले...

या प्रकाराचा पंचनामा Panchnama आपण करणार असल्याचे सांगून पृथ्वीराज पवार Prithviraj Pawar म्हणाले की आता 'कॅसिनो हटाओ, सांगली बचाओ' Kasino Hatao, Sangali Bachaoo हा नारा आम्ही दिला आहे.
Sangali Kasino
Sangali Kasinosarkarnama

सांगली : पोलिस उपअधीक्षकांच्या कार्यालयापासून अवघे १०० मीटर अंतरावर असलेल्या संघर्ष मार्केटमध्ये मुळातच परवानगी नसलेल्या पण बिनधास्तपणे चालू केलेल्या गोवा स्टाईल कॅसिनो सेंटर आणि लॉटरी सेंटरच्या संघर्षातून गँगवॉर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील एका गटाने दुसऱ्या दुकानातील संगणक, लॉटरीचे साहित्य, टेबलाची नासधूस केली. सांगली स्टेशन चौकातील या प्रकाराने नागरिक, विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सांगलीच्या पोलिस उपाधीक्षकांच्या कार्यालयाजवळील स्टेशन चौकात महापालिकेने खोक्यांचे पुनर्वसन करून त्या ठिकाणी गणेश मार्केट व संघर्ष मार्केट उभे केलं आहे. यातील संघर्ष मार्केटमध्ये अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. या परिसरात अवैध कॅसिनोही चालविले जातात.

Sangali Kasino
इस्लामपूर : निशिकांत पाटील यांनी जयंत पाटलांना अक्षरशः धारेवर धरले...

तेथील दोन दुकानदारांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यातून पूर्वीही भांडणे झाली होती. गुरुवारी सायंकाळी या वादाचे पर्यावसान जोरदार संघर्षात झाले. एका गटाच्या टोळीने दुसऱ्याच्या दुकानाची नासधूस केली. महागडे संगणक, यंत्रे जमिनीवर आपटून फोडली. तेथून जीव वाचवून मालकाने धूम ठोकली. हा राडा झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Sangali Kasino
विश्वजित कदम, देशमुख यांना त्यांच्या धोरणाने चालू द्या..पण आम्ही आमचं ठरवलयं!

सांगली शहर पोलिसांनी येथे पाहणी केली, मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल नाही. या राड्याबद्दलचे आणि जिल्ह्यातील एकूणच अवैध धंद्याबाबतचे व्हिडिओ थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले जात आहेत. सांगलीच्या पोलिसिंगचा आणि इथल्या कायदा सुव्यवस्थेचा कसा बाजार मांडला आहे, याचा पंचनामा आपण करणार असल्याचे पृथ्वीराज पवार यांनी म्हटले आहे. कॅसिनो हटाओ, सांगली बचाओ हा नारा त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com