मोहोळ तालुका सोडला, तर तुम्हाला कोण ओळखतो? : उमेश पाटलांचा राजन पाटलांना रोखठोक सवाल

मला ओळखतं नव्हता, तर मुलाला जिल्हाध्यक्ष करण्यासाठी माझ्याकडे किती हेलपाटे घातले, हेही जनतेला सांगा.
Umesh Patil
Umesh Patil Sarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : ‘‘माझे काय चुकते, याबाबत तुम्ही पक्षश्रेष्ठीकडे जरूर तक्रार करा; परंतु मी वस्तुस्थिती मांडली म्हणून पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करू नका. उमेश पाटील (Umesh Patil) यांना ओळखत नाही, असे वक्तव्य माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी केले होते. मला ओळखतं नव्हता, तर मुलाला जिल्हाध्यक्ष करण्यासाठी माझ्याकडे किती हेलपाटे घातले, हेही जनतेला सांगा. मोहोळ तालुका सोडला, तर तुम्हाला कोण ओळखतो, याचे आत्मपरीक्षण करा. मला माझ्या नरखेड जिल्हा परिषद मतदार संघातील मतदारांनी साडेसात हजार मते दिली, माझी ओळख नसती तर मग ही मते कोणी दिली, असा रोखठोक सवाल उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांना केला. (If you leave Mohol, who will know you : Umesh Patil questions Rajan Patil)

माजी आमदार राजन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेश पाटील यांच्यावर काही आरोप व टीका केली होती त्याचा खरपूस समाचार उमेश पाटील यांनी घेतला. आपल्या बेताल वक्तव्या बाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली अशी सर्वत्र चर्चा आहे, मात्र ती माफी होत नाही. ज्या दिवशी असे वक्तव्य केले होते व त्याची जाणीव झाल्यानंतर लगेच त्याच दिवशी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन माफी मागावयास पाहिजे होती. माजी आमदार पाटील यांच्या अशा बेताल वक्तव्यामुळे ज्या ज्या समाजात पाटील आडनाव आहे त्यांचा अपमान झाला आहे व पक्षाची प्रतिमा ही मलिन झाली असल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले.

Umesh Patil
राजन पाटलांचे चॅलेंज उमेश पाटलांनी स्वीकारले : ‘तुम्ही स्वतः माझ्या विरोधात निवडणूक लढवा...’

पराभव झाल्यानंतर तो मोकळ्या मनाने स्वीकारायला शिका. भीमा सहका साखर कारखान्याची निवडणूक ही केवळ लिट्‌मस टेस्ट आहे, भीमात कुणाची किती ताकद आहे, हे समजलेच असेल, असा टोलाही त्यांनी राजन पाटलांना लगावला. भीमाच्या निवडणुकीत तुमच्या घरातील कोणालाही उभे केले नाही. तुमच्याकडे दोन वाघ आहेत, मग ते डरपोक आहेत काय? त्यांना का निवडणुकीला उभे केले नाही, असा सवालाही त्यांनी या वेळी केला.

Umesh Patil
मौनात गेलेले कोल्हे अवतरले अन्‌ भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले ‘मी राष्ट्रवादीत...’

उमेश पाटील म्हणाले की, लोकनेते कारखान्याकडे सर्व उपपदार्थाची निर्मिती आहे. शिवाय तो सतरा वर्षांपूर्वीच कर्जमुक्त झाला आहे. तो खासगी नसून पब्लिक लिमिटेड आहे म्हणता. मग त्यातून मिळणारे पैसे पब्लिकला का मिळत नाहीत. अशा कर्जमुक्त कारखान्याने किमान 3 हजार 500 रुपये दर देणे अपेक्षित आहे. केवळ 2 हजार 200 ते 2 हजार 300 रुपये देऊन लोकांची बोळवण करता. मग उर्वरित पैसे कुणाच्या खिशात जातात.

Umesh Patil
राज्यपालांच्या विधानावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘राजघराण्यातील सदस्य म्हणून मी...’

मोहोळ नगरपरिषदेची आगामी निवडणूक सर्वजण मिळून लढणार आहोत. अनगर नगरपंचायतीची निवडणूक लागली तरीही ती लोकशाही मार्गाने लढू. जनता काय निर्णय देईल तो देईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर, माजी उपसभापती मानाची माने, राहुल क्षीरसागर, संजय विभुते, बालाजी पवार, शामराव जवंजाळ, अशोक क्षीरसागर, सुरेश चव्हाण, प्रसन्न पाटील, प्रमोद आतकरे, सुग्रीव दाढे, विकी देशमुख, राहुल व्यवहारे, पद्माकर देशमुख उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com