त्यांच्यात नैतिकमूल्ये शिल्लक असतील तर त्यांनी सुरक्षेचा लवाजमा परत करावा

माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) हे वाय सुरक्षा व्यवस्था घेऊन फिरत आहेत
Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat News Updates, Ahmednagar News
Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat News Updates, Ahmednagar NewsSarkarnama

Vikhe Vs Thorat : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना येथे आज गणेश चतुर्थी निमित्त गणरायाची प्रतिष्ठापणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) व त्यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील ( Shalini Vikhe Patil ) यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) हे वाय सुरक्षा व्यवस्था घेऊन फिरत आहेत, अशी जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. यावरून मंत्री विखे पाटील यांनी थोरातांवर जोरदार टीका केली.

महाविकास आघाडीतील माजी मंत्री बाळासाहेब थोरात राज्य सरकारची वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत राहत आहेत. यावर मंत्री विखे पाटील म्हणाले, सरकार असतानाही त्यांनी सुरक्षिततेची गरज नव्हती. कारण त्यांना जनतेची कामेच करायची नव्हती. दोन वर्षे लोक घरात बसून राहिले होते. सत्ता गेल्यानंतरही ते सुरक्षा कवच घेऊन फिरत आहेत. त्यांनी स्वतःहून सुरक्षा परत करण्याची गरज आहे. सरकार एका दिवसात फतवा काढून सुरक्षा काढून घेईल, यावरून सरकारवर टीका होईल. त्यापेक्षा त्यांच्यात नैतिकमूल्ये शिल्लक असतील तर त्यांनी सुरक्षेचा लवाजमा परत करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat News Updates, Ahmednagar News
थोरात-विखे गटात झाली चुरशीची फाईट : अखेर चिठ्ठीने निकाल फिरविला

ते पुढे म्हणाले की, लोकशाहीची भाषा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तोंडी योग्य दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे. न्यायालयाचा आदर करणार नसाल तर तुम्ही कोणत्या लोकशाहीची भाषा करत आहात. राजकीय व सामाजिक व्यवस्थेला न्यायालयातच आधार आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा प्रत्येकाने आदर करायला शिकले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना मी महत्त्व देत नाही असे सांगितले होते. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही बाळासाहेब थोरातांविषयीच्या प्रश्नावर तुम्हीही त्यांना फार महत्त्व देऊ नका, असे प्रसारमाध्यमांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in