हल्ल्यामागे भाजपचे षडयंत्र सिध्द झाल्यास राजीनामा देऊ...

आम्ही राजकीय विरोधक असलो तरी महाराष्ट्राचे Maharshtra नेते म्हणून आम्हाला शरद पवार sharad Pawar यांचा शंभर टक्के आदर आहे, असे खासदार रणजितसिंह निबांळकर यांनी सांगितले.
Ranjitsinh Naik Nimbalkar
Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama

फलटण शहर : खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. परंतु, यामागे भाजपचा हात असल्याचा चुकीचा आरोप होत आहे. भाजपची संस्कृती व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुरेपूर विश्वास व खात्री आहे. त्यामुळे यामागे भाजपच षडयंत्र सिध्द झाले तर आपण निश्चितपणे राजीनामा देऊ, असे स्पष्ट मत माढाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

सुरवडी येथे खासदार निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे राजकीय नेतृत्व आहे. आम्ही राजकीय विरोधक असलो तरी महाराष्ट्राचे नेते म्हणून आम्हाला शरद पवार यांचा शंभर टक्के आदर आहे, असे स्पष्ट करून खासदार निंबाळकर म्हणाले, ‘‘लोकशाही पध्दतीत निषेध व्यक्त करण्यासाठी विविध मार्ग आहेत. कुणाच्या कुटुंबावर असा भ्याड हल्ला होत असेल तर भाजपचा माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी त्याचा निषेध व्यक्त करतो. खासदार सुप्रियाताईंनी जर परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसती, तर निश्चितपणे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

Ranjitsinh Naik Nimbalkar
video : शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ...

’’ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी उचकवल्याने जमावाने हा प्रकार केला का, यावर खासदार निंबाळकर म्हणाले,‘‘ यामागे निश्चितपणे काहीतरी षडयंत्र आहे. परंतु, चौकशीतून नेमकं कोण ? हे निष्पन्न होत नाही, तोवर बोलणे योग्य ठरणार नाही.’’ दिगंबर आगवणे यांनी केलेल्या आरोपाबाबत ते म्हणाले,‘‘ दिगंबर आगवणे अचानकपणे मीडिया समोर गेले. माझ्याविरुध्द पुरावे असल्याचे सांगून मला बदनाम करण्याचा त्यांचा कट न्यायालयाने व पोलिसांनी उधळला. या कटात फलटणच्या काही लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. योग्य वेळ आल्यावर आपण त्यावर बोलू.

Ranjitsinh Naik Nimbalkar
Video : राज ठाकरेंना भाजपला सोबत घेणे परवडणारे नाही - आठवले

विरोधकाला पोलिसांमार्फत संपवायचे किंवा बदनामी करायची ही विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची सवय आहे. परंतु, माझ्या बाबतीमध्ये त्यांचा हात आहे किंवा नाही, यावर पुराव्याशिवाय बोलणे योग्य ठरणार नाही.’’ माझ्या प्रकरणात प्रशासनावर दबाव आला, ताण आला. परंतु, त्यांनी आपला दुरुपयोग होऊ दिला नाही, असेही खासदार निंबाळकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in