शासनाने मनात आणले तर.. बाजार समितीत शेतकरी मतदार होऊ शकतात....

गेल्या अधिवेशनात Last Assembly Session शेतकऱ्यांना Farmers मतदानाचा अधिकार Voting Rights देण्याचा भाजपचा जुना निर्णय BJP's old decision पुन्हा मांडुन त्याचा कायदा केला.
NCP MLA Balasaheb Patil
NCP MLA Balasaheb Patilsarkarnama

कऱ्हाड : कोणतीही निवडणूक आली की मी कायम सावध असतो. मला लगेच कळते काय होतं ते. त्यामुळे मी सावध आहे, असे सुचक वक्तव्य माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. बाजार समितींच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे मतदान घेणे समितींना परवडणार नाही. कारण शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, शासनाने जर मनात आणले तर शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळु शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कराड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तुमची तयार सुरू आहे का, या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, कोणतीही निवडणूक असली की मी कायम सावध असतो. आत्ता लम्पी आला आहे. मी लगेच बैठक घेऊन सुचना केल्या. मला लगेच कळते काय होत ते. त्यामुळे निवडणूक लागेल त्यावेळी बघु. मी सावध आहे.

NCP MLA Balasaheb Patil
बाजार समिती निवडणुकीत मतदान कोण करणार हे तर सांगा!

बाजार समितीच्या निवडणुकांबात ते म्हणाले, सोसायट्यांच्या निवडणूका झाल्यानंतर बाजार समितीच्या निवडणूक घ्याव्यात, असा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता. सध्या सोसायट्यांच्या निवडणूका पूर्ण झाल्या आहेत. निवडणूक प्राधिकऱणाने जुन्या प्रमाणे आम्ही याद्या गोळा करत आहोत. आमची तयारी सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

NCP MLA Balasaheb Patil
Karad : पालकमंत्री नसल्याचा राज्याच्या कारभारावर परिणाम... बाळासाहेब पाटील

गेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा भाजपचा जुना निर्णय पुन्हा मांडुन त्याचा कायदा केला. त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झालेली दिसत नाही. मात्र, शेतकऱ्यांतून मतदान घेऊन बाजार समितींना निवडणूका परवडणार नाहीत. शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

NCP MLA Balasaheb Patil
नरेंद्र मोदींचा 10 लाखाचा सूट चालतो, पण राहुल गांधीचा टी शर्ट डोळ्यात खुपतो का ?

ज्या शेतकऱ्यांची दोन ठिकाणी शेती आहे. त्यांना मतदानाचा अधिकार कोठे द्यायचा, हा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आत्ता जी यादी होणार आहे. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, हमाल, मापाडी यांच्यातूनच निवडणूक होईल. मात्र, शासनाने जर मनात आणले तर शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळु शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in