मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली तर आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेपेक्षा पन्नास पट जास्त गर्दी दाखवेलं...

Aditya Thackeray| Shambhuraj Desai : आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा ही राष्ट्रवादी पुरस्कृत...
Aditya Thackeray, Shambhuraj Desai Latest News
Aditya Thackeray, Shambhuraj Desai Latest Newssarkarnama

मोरगिरी : आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची निष्ठा यात्रा ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुरस्कृत होती. पाटण तालुक्यातील पारंपारिक विरोधक राष्ट्रवादीला मानणारे गाड्याच्या गाड्या भरून ठाकरेंच्या सभेला आले होते. निष्ठा यात्रेच्या निमित्ताने एका दिवसापुरता का होईना‌ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाटणकर गटाच्या लोकांच्या गळ्यात आम्हाला भगवा गमजा बघायला मिळाला. सभेच्या गर्दीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर गर्दी जमवण्यात आली होती, असा पलटवार माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज (ता.२ ऑगस्ट ) केला. (Aditya Thackeray, Shambhuraj Desai Latest News)

Aditya Thackeray, Shambhuraj Desai Latest News
उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला : आदित्य यांच्या सभेनंतर पुण्यात शिवसैनिक आक्रमक

आमदार देसाई म्हणाले, आदित्य ठाकरे यांना दाखवण्यापुरतीच गर्दी जमवण्यात आली होती. त्यांना पाठबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिले होते. त्याचा मी फारसा विचार करत नाही. सभेत काही वक्ते माझ्यावरती वैयक्तिक बोलले. त्यापैकी माजी आमदार दगडूदादा सपकाळ म्हणाले की मी पुन्हा निवडून येवुन दाखवावे. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख मी करणार नाही. मात्र त्यांची निवडणुकीत पडण्याची हाऊस अजून भागलेली दिसत नाही. 2014 ला त्यांच्या जावळी मतदारसंघातून ते उभे राहिले होते. त्यांना 22 ते 23,000 मते पडली होती. ते चौथ्या क्रमांकावर गेले होते. स्वतःच्या मतदारसंघात त्यांना फक्त 22 ते 23 हजार मतं मिळतात. त्यांनी पाटण मतदारसंघातून कोणी निवडून याव आणि मी कसा निवडून येतो हे असं म्हणणं योग्य नाही, अशी टीका देसाई यांनी केली.

Aditya Thackeray, Shambhuraj Desai Latest News
'धर्मवीर' काहींना रुचला नाही, भविष्यात पार्ट- 2, 3 येऊ शकतो; मुख्यमंत्री शिंदेंचं सुचक वक्तव्य

पुढे बोलतांना देसाई म्हणाले की, आणखीन कोणीतरी फडतूस कार्यकर्ता एकेरी बोलला. पदे मिळवण्यासाठी बायको एका पक्षात आणि स्वतः एका पक्षात अशी त्याची अवस्था आहे. त्यांना उत्तर देणं गरजेचं वाटत नाही. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे म्हणाले, मी गद्दारी केली. दोन महिने आम्ही सांगतोय गद्दारी केली नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. उलट राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही अडीच वर्ष संसार केला. त्याच मंत्रिमंडळात आम्हाला बसवलं, हीच अडीच वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी केलेली प्रतारणा होती. सातारा जिल्ह्यात माझ्या मतदार संघात गर्दी दाखवण्याचा प्रयत्न केला, असे देसाई म्हणाले.

दरम्यान,आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मी सातारा जिल्ह्यातील दौऱ्यासाठी वेळ मागीतली आहे. जर त्यांनी या मतदारसंघासाठी वेळ दिली. तर निष्ठा यात्रेला जमलेल्या लोकांपेक्षा पन्नास पट जादा गर्दी माझ्या मतदार संघात दाखवून देवू. तेवढी ताकद, हिंम्मत आमच्या आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com