Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiSarkarnama

संभाजीराजेंनी भाजपकडे उमेदवारी मागितली तर? : चंद्रकांतदादांनी स्पष्टच सांगितले...

संभाजीराजेंचा (Sambhhaji Raje) शिवसेनेने सन्मान ठेवला नाही, असा भाजपचा आरोप

कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांना शिवसेनेने सन्मान देणे अपेक्षित होते. पण त्यांनी तो दिला नाही. त्यांच्या खासदारकीच्या ६ वर्षात आम्ही एकदाही राजेंना भाजपच्या प्रचारात आणले नाही. आम्ही त्यांचा सन्मान ठेवला. असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज शिवसेनेला लगावला.

संभाजीराजे यांच्या उमेदवारी विषयी विचारले असता आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले,‘ राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणून भाजपने संभाजीराजे छत्रपती यांना सन्मानाने राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी दिली. सहा वर्षात एकदाही आम्ही त्यांना पक्षाच्या प्रचारात किंवा कोणत्याही आंदोलनात येण्याची सक्ती केली नाही. आम्ही त्यांचा आणि त्यांच्या भूमिकांचा योग्य सन्मान राखला. मात्र शिवसेनेने त्यांचा सन्मान राखला नाही. शिवसेनेत प्रवेश केला तरच उमेदवारी असे सांगून त्यांनी संभाजीराजे यांचा मान राखला नाही.

Sambhajiraje Chhatrapati
संभाजीराजे यांना एकमेव आधार उरला तो मित्र मानलेल्या फडणविसांचा!

संभाजीराजे यांनी पहिल्यांदाच आपण अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेची निवडणूक लढणार हे जाहीर केले आहे. त्यामुळे आता भाजपच्या उमेदवारीचा प्रश्नच येत नाही. अजून पर्यंत तरी त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली नाही. मागितली तर विचार करू. राज्‍यसभेवर पक्षाकडून कोणाला घ्यायचे याचा निर्णय केंद्री पातळीवर होतो.’

पेट्रोल दराबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले,‘ केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे भाव करकपात करून लक्षणीय कमी केले. राज्य सरकारने मात्र २ रुपयांनी कमी करू अशी केवळ घोषणा केली. प्रत्यक्षात त्यांनी एकही रुपया कमी केला नाही. केवळ घोषणा करून जनतेची फसवणूक केली. भाजपशासीत राज्यात महाराष्ट्रापेक्षा २० रुपये कमी किंमतीने पेट्रोल आणि डिझेल मिळते.’

Sambhajiraje Chhatrapati
संभाजीराजे-सेना नवा ट्विस्ट : दुपारी बारापर्यंत `शिवबंधन` बांधण्याची मुदत; अन्यथा...

मुश्रीफांनी सत्य जाणून घ्यावे

केंद्राने जीएसटीचा परतावा दिला नाही असे मंत्री मुश्रीफ म्हणाले. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले,‘ मुश्रीफांना सत्य जाणून घ्यायचे नाही. कारण त्यांना खोटेच बोलायचे आहे. केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड यांनी काही दिवसांपूर्वीत सर्व हिशोब सांगितला आहे. जीएसटीचा परतावा केंद्राला वेगळा द्यावा लागत नाही. एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रोज रात्री १२ वाजता जीएसटी मधील केंद्राची रक्कम केंद्राला तर राज्याची रक्कम राज्याला दिली जाते. पण राष्ट्रवादीची प्रवृत्ती खोटे बोल पण रेटून बोल अशीच आहे.’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in