'संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्यास ठाकरे, अजितदादा आणि थोरातांच्या घरात घुसणार'

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले प्रयत्नरत आहेत.
 Sambhaji Raje
Sambhaji RajeSarkarnama

पुणे - राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त आहेत. यातील सहाव्या जागेसाठी खासदार संभाजी राजे भोसले प्रयत्नरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी राजे यांना पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा व छावा संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ( 'If Sambhaji Raje is not given candidature, he will enter the house of Thackeray, Ajit Dada and Thorat' )

मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वयक अंकुश कदम यांनी सांगितले की, संभाजीराजे यांना विरोध करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक भूमिकेत आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारीला संजय राऊत सातत्याने विरोध करत आहेत. संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिव प्रेमी जनता उतरवेल.

 Sambhaji Raje
अशोक चव्हाणांना दोन दिवसांचे अल्टीमेटम देणारे छत्रपती संभाजी राजे नरमले ..? 

2024 ला याची राजकीय किंमत मोजावी लागणार. एकीकडे प्रियांका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना अटी शर्थी न टाकता राज्यसभेवर पाठविण्याची तयारी दाखवता. मात्र ज्या छत्रपतींच्या नावावरती एवढी वर्षे राजकारण करत आहात एवढी वर्ष सत्ता भोगत आहेत. या शिवसेनेचा शिव आमच्या छत्रपतींचा आहे, अशी टीकाही अंकुश कदम यांनी केली.

छावा संघटनेने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, संभाजीराजे यांनाच का उमेदवारी दिली पाहिजे? कारण संभाजीराजे यांनी कधीही भाजपच्या कार्यक्रमला हजेरी लावली नाही, दिल्लीत शिवजयंती केली. धर्म पंथ जात पाथ यापलीकडे ते पाहतात. ते कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधित्व घेत नसल्याचे दुखणे विविध पक्षांना आहे. शिवसेनेचा त्यांना शिवबंधन बांधायचा कट आहे, असा आरोप छावा संघटनेने केला आहे.

 Sambhaji Raje
Video : औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्या सोबत संभाजी राजे जाणार का - नितेश राणे

खासदार संजय राऊत यांचा छावा संघटना निषेध करते. शिवाजी महाराज यांच नाव वापरलं जातं, सेना, महाविकास आघाडी यांचे ज्येष्ठ नेते शरद पवारांना हे शोभत नाही. शरद पवार तुमची विश्वासार्हता राहिली नाही. संजय राऊत म्हणतात की 42 मतं आहेत का? तुमचे जे 60-50 लोक निवडून आलेत ते शिवाजी महाराजांमुळे, अशी टोलाही छावा संघटनेने लगावला आहे.

आम्ही 2 दिवस वाट बघू आणि थेट वर्षा, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या घरी चाल करून जाणार आहोत. या 3 ही नेत्यांच्या घरी चाल करून, शिवाजी महाराजांच्या पोवाडा गाणार आहोत. वंचितांचे प्रश्न देशाच्या पटलावर नेण्यासाठी आम्हाला संभाजी राजे तिथे हवे आहेत. छत्रपती यांना कुणीही डेडलाईन देऊ शकत नाही. शिवाजी महाराजांच्या वंशाजला त्यांनी पाठिंबा दिला नाही तर आम्ही बघू, अशा इशाराही छावा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in