इचलकरंजी आता महापालिका झाली : धैर्यशील मानेंचा विरोधकांना धक्का..

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात आणखी एक महानगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे.
Dhairyashil Mane
Dhairyashil Manesarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात आणखी एक महानगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे इचलकरंजीचा महापालिका होण्याचा मार्ग गुरुवारी (ता. ५) मोकळा झाला आहे. आता पालिकेचे महापालिकेत रूपांतर होणार आहे. याबाबतची घोषणा गुरुवारी नगरविकास विभागाने अधिसूचना जारी करून केली. पुढील निवडणूक महापालिका म्हणून होणार आहे. त्यामुळे नगरपालिका म्हणून होणार निवडणूक रद्द झाल्यात जमा आहे. ही महापालिका करताना शहराची हद्दा वाढविण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी अचानकच या संदर्भातील आदेश दाखवत घोषणा केल्याने स्वपक्षासह इतर विरोधकही बुचकळ्यात पडले आहेत.

Dhairyashil Mane
सोमय्या यांनी भेट घेताच राणा दांपत्याच्या डोळ्यात अश्रू.....

याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इचलकरंजी ही महाराष्ट्रातील २८ वी महानगरपालिका असणार आहे. या निर्णयामुळे पालिकेची संभाव्य सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया थांबणार आहे. पुढील निवडणूक महापालिका म्हणून होणार आहे. याबाबत शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांनी पाठपुरावा केला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महानगर पालिका करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार इचलकरंजी पालिकेत पाच खातेप्रमुखांची एक समिती स्थापन करण्यात आली होती.

Dhairyashil Mane
संजय राऊतांची खोचक टीका : भाड्याच्या माणसावर भगवी शाल टाकण्याचा भाजपचा उद्योग

त्यामुळे इचलकरंजी महापालिका करण्याची मागणी अनेक दिवसापासून केली जात होती. अखेर महाविकास आघाडी सरकारने महापालिकेला मंजूरी दिली. त्यामुळे खासदार धैर्यशिल माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांचे आभार मानले आहेत. त्या संदर्भात त्यांनी वरिष्ट मंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com