भगिरथ भालकेंना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही : राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची ग्वाही

विठ्ठल साखर कारखान्याला मदत करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी नक्की बोलेन
भगिरथ भालकेंना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही : राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची ग्वाही

पंढरपूर : ‘‘पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू होण्यासाठी लागणारी मदत मिळावी, यासाठी आमदार (स्व.) भारतनाना भालके (bharath bhalke) यांचा एक जिव्हाळ्याचा सहकारी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी नक्कीच बोलेन. राज्य सरकारने सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याचे धोरण यापूर्वीच घेतले आहे. आगामी काळातसुद्धा पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला (भगिरथ भालके, Bhagirath Bhalke) आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी भालके यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील, याची ग्वाही दिली. (I will talk to Deputy Chief Minister Ajit Pawar regarding help of Vitthal factory : Sunil Tatkare)

पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेले सुनील तटकरे हे माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी भगिरथ भालके यांची पाठराखण करत विठ्ठल कारखान्याच्या मदतीसंदर्भात भाष्य केले. विठ्ठल साखर कारखाना बंद आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे जे उमेदवार (भगिरथ भालके) होते, ते आता समारे येत नाहीत, असा आरोप होतोय. कारखाना सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत होणार आहे का, असा प्रश्न तटकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले.

भगिरथ भालकेंना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही : राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची ग्वाही
पुण्याचे बाजीराव गिरीश बापटच : बापट म्हणतात ‘...मग माझी मस्तानी कुठाय!’

खासदार तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (स्व.) भारतनाना भालके यांनी पंढरपूर परिसराची अतिशय उत्तमपणे सेवा केलेली आहे. मलाही त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. कोरोनाचा मुकाबला करत असतानाच या परिसरात चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यावेळी कोरोनाचे बंधन झुगारून भारतनानांनी शेतकऱ्यांसाठी शेताच्या बांधापर्यंत जाण्याची भूमिका घेतली. दुर्दैवाने त्यामध्येच त्यांचा कोरोनाचा आजार बळावला.

भगिरथ भालकेंना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही : राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची ग्वाही
कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विशाल फटेच्या लॉकरमध्ये दमडीही नाही!

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विठ्ठल कारखान्याला मदत मिळावी, यासाठी भारतनाना सतत आवाज उठवत राहिले. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत या विषयांवर भारतनाना यांच्या समवेत आम्हीही चर्चा केलेली आहे. माझा थेटपणे या गोष्टींशी संबंध येत नसला तरी (स्व.) भारतनानांचा एक जिव्हाळ्याचा सहकारी या नात्याने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मदतीसंदर्भात मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नक्की चर्चा करेन. राज्य सरकारने अशा कारखान्यांना मदतही केली पाहिजे. तसे धोरणही यापूर्वी राज्य सरकारने घेतले आहे. येथील नेतृत्वाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. तसेच, शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची झळ पोचणार नाही, याची खबरदारी आम्ही निश्चितपणे घेऊ, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

भगिरथ भालकेंना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही : राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची ग्वाही
अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतील गटबाजीवर तोडगा काढणार : जयंत पाटील

वाईनविक्रीचा निर्णय म्हणजे चूक नव्हे

वाईनविक्रीच्या परवान्याबाबत तटकरे म्हणाले की, लोकशाही आघाडीचे सरकार आल्यावर वायनरी इंडस्ट्रीला प्रोत्साहन द्यावे; म्हणून नाशिकच्या परिसरात अशा उद्योगांना राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. जगाच्या स्पर्धेत अशा प्रकारचा निर्णय घेणे म्हणजे चूक आहे, असे मला वाटत नाही. पण टीका करणाऱ्यांनी यापाठीमागचा व्यवस्थितरित्या अभ्यास केला असता, तर त्यांनाही या निर्णयामागचा हेतू समजला असता.

भगिरथ भालकेंना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही : राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची ग्वाही
अजित पवारांचे धक्कातंत्र : काकडे, जगतापांच्या कार्यकर्त्यांना दिली प्रथम संधी!

पेगॅसिसबाबत तटकरे म्हणाले...

पेगॅसिसच्या संदर्भात खासदार तटकरे म्हणाले की, या प्रश्नासंदर्भात मला तपशीलवार माहिती नाही. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर आम्ही याबाबत चर्चा करू. यासंदर्भात सर्व विरोधी पक्षांची देशपातळीवर जी भूमिका असेल, तीच आमचीही असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com