`मरेपर्यंत पवारांची साथ सोडणार नाही; पण कुरघोडी कोणी केले ही नक्की जाहीर करणार`

सातारा शासकिय विश्रामगृहात खासदार शरद पवार sharad pawar यांचे रात्री आगमन झाले. त्यावेळी त्यांनी प्रथम आमदार शशीकांत शिंदे shashikant shinde यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली.
`मरेपर्यंत पवारांची साथ सोडणार नाही; पण कुरघोडी कोणी केले ही नक्की जाहीर करणार`
Shashikant Shinde, Sharad Pawarsarkarnama

सातारा : खासदार शरद पवार माझी नेहमीच समजूत काढतात, कारण पवार साहेब आहेत म्हणून मी आहे. उद्या (गुरूवारी) मी माझी भूमिका मांडणार असून त्यामध्ये पुढील राजकीय वाटचाली बाबतचा निर्णय ही सांगणार आहे. मी राष्ट्रवादीचा सच्चा पाईक असून मरेपर्यंत पवार साहेबांची साथ सोडणार नाही. आता मी मोकळाच आहे. त्यामुळे सातारा, जावळीसह सर्व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी फिरणार असल्याचे आमदार शशीकांत शिंदे यांनी सांगितले.

शशीकांत शिंदे यांच्या जिल्हा बँकेतील पराभवानंतर त्याच दिवशी सायंकाळी सातारा शासकिय विश्रामगृहात खासदार शरद पवार यांचे रात्री आगमन झाले. त्यावेळी त्यांनी प्रथम आमदार शशीकांत शिंदे यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही चर्चा केली. या चर्चेनंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील निघून गेले. मात्र, शशीकांत शिंदे हे पवार साहेबांसोबत थांबून होते.

Shashikant Shinde, Sharad Pawar
राष्ट्रवादी भवनावरील दगडफेक दुर्दैवी : शरद पवार

रात्री उशीरा ते विश्रामगृहातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी घेरले. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याविषयी प्रश्नाची सरबत्ती केली. थोडावेळ शशीकांत शिंदे गंभीर चेहऱ्याने थांबले. पण त्यांनी आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले, ''मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे. आजच्या बैठकीत पवार साहेबांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. पण, जिल्हा बँकेतील निवडणुकीत माझ्याविषयी झालेल्या कुरघोड्यांविषयी मला जे बोलायचं आहे ते मी उद्या (ता. २५) पत्रकार परिषदेत बोलणार आहे.

Shashikant Shinde, Sharad Pawar
शशीकांत शिंदेंच्या ओठी अखेर ते नाव आलेच...

शरद पवार यांनी तुमची समजूत काढली का काय या प्रश्नावर ते म्हणाले, ''पवार साहेब नेहमीच माझी समजूत काढत असतात. पवार साहेब आहेत म्हणून मी आहे. त्यांनी फक्त कशापद्धतीने निवडणूक झाली, कसं काय झालं.'' त्यावर मी माझी भूमिका त्यांच्यापुढे मांडली.

Shashikant Shinde, Sharad Pawar
आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी;पाहा व्हिडिओ

''मी पत्रकार परिषदेत माझं म्हणणं मांडणार आहे. त्यावेळी मी माझ्या पुढील राजकीय वाटचाली विषयीचा निर्णय ही जाहीर करेन''. त्यावर पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादीत राहूनच की दुसऱ्या कोणत्या पक्षात जाऊन असे विचारले. त्यावर आमदार शिंदेंनी ''मी राष्ट्रवादीचा आणि पवार साहेबांचा सच्चा पाईक आहे. मरेपर्यंत पवार साहेबांना सोडणार नाही. पण आता सातारा, जावळीसह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याची जबाबदारी माझी आहे. कारण आता मी मोकळाच आहे,'' असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in