मी राष्ट्रवादीत जाणार नाही; भाजपमध्येच समाधानी!

जयंतरावांनी जतला सहा टीएमसी पाणी मंजूर केले. शिवाय, विस्तारीत म्हैसाळ योजनाही लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र, सहा महिन्यांत योजनेच्या सर्व्हे व्यतिरिक्त आश्वासनाच्या भूलथापाच मिळाल्या.
Vilasrao Jagtap
Vilasrao JagtapSarkarnama

जत (जि. सांगली) : जयंतरावांनी (jayant patil) जतला सहा टीएमसी पाणी मंजूर केले. शिवाय, विस्तारीत म्हैसाळ योजनाही लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र, सहा महिन्यांत योजनेच्या सर्व्हे व्यतिरिक्त आश्वासनाच्या भूलथापाच मिळाल्या. यासोबतच मी भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) येणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. परंतु मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही. इथेच मी समाधानी आहे, असा रोखठोक पवित्रा माजी आमदार विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांनी आज (ता. १६ एप्रिल) घेतला. (I will not go to the NCP; Satisfied in BJP: Vilasrao Jagtap)

जयंत पाटील हे राष्ट्रवादी संवाद यात्रेच्या निमित्ताने सांगलीत येत आहेत, या पार्श्वभूमीवर जगताप बोलत होते. जत तालुक्यातील सिंदूर येथील कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी खासदार संजय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, चेअरमन आप्पासो नामद, ज्येष्ठ नेते शिवाप्पा तावंशी, रामाण्णा जीवानावर, बसगोंडा जाबगोंड, सरपंच नागनगौडा पाटील यावेळी उपस्थित होते.

Vilasrao Jagtap
राजेश क्षीरसागरांनी शब्द पाळला; शिवसेनेच्या प्रभावक्षेत्रातून जाधवांना ६५९० चे मताधिक्क्य!

जगताप म्हणाले,‘‘ गेली चाळीस वर्ष मी राजकारणात आहे. जत तालुक्याच्या विकासासाठी जे शक्य ते मनापासून करण्याचा माझा प्रयत्न आहे. गेल्या अडीच वर्षांत कोणतीही विकास कामे झालेली नाहीत. आम्ही व खासदार पाटील यांनी म्हैसाळ योजनेतून वगळलेल्या ४८ पूर्णत: १७ अंशतः गावांसाठी विस्तारित म्हैसाळ योजना मांडली. संखच्या सभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी योजनेला तत्वतः मान्यताही दिली होती. मात्र, राज्यातील सरकार गेले. पुढे जयंतरावांनी आश्वासन दिले. गेल्या सहा महिन्यांत विस्तारीत योजनेच्या सर्व्हेशिवाय काहीही झालेले नाही. त्याबाबत पुढील सर्व मंजूरी घेऊन राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद नाही. केवळ भूलथापा सुरू आहेत.’’

Vilasrao Jagtap
चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरच्या जनतेने पुन्हा पुण्याला पाठविले : सतेज पाटलांचा हल्लाबोल

प्रकाश जमदाडे म्हणाले,‘‘जिल्हा बँक शेतकरी हिताचे धोरण राबवत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी परतफेड योजना आणली असून याचा लाभ घ्यावा.’’ खासदार पाटील म्हणाले,‘‘ जत तालुक्यातील दुष्काळी जनतेला पाणी देण्यासाठी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून २१०० कोटींचा निधी बंदिस्त पाईपलाईनसाठी आणला होता. त्यामुळे अनेक गावात म्हैसाळ योजनेचे पाणी दिसत आहे. शिवाय, उर्वरित वंचित गावांना पाणी देण्यासाठी केंद्रातून निधी आणू.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com