म्हणालो होतो, 'मी पुन्हा येईन' अन् सिंचन योजनाही माझीच वाट पाहत बसली : फडणवीसांचा पुनरुच्चार!

Devendra Fadanavis : मागील महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले.
Devendra Fadanavis
Devendra FadanavisSarkarnama

सोलापूर (मंगळवेढा) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथे सभा घेतली. या सभेत बोलताना फडणवीसांनी आपलं जुनं वक्तव्य म्हणजे 'मी पुन्हा येईन'चा पुन्हा एकदा उल्लेख केला. फडणवीस म्हंटले की, "मी या आधी मंगळवेढा उपसासिंचन योजना राबणार असं आश्वासन दिल्यानंतर सरकारच गेलं, पण मी सांगितलं होतं की, मी पुन्हा येईन आणि ही योजना देखील मी पु्न्हा यायची वाट पाहत बसली."

Devendra Fadanavis
Gujarat Assembly Elections : आम आदमी पक्षाने जाहीर केला गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार

मंगळवेढा येथे शेतीविषयक एका कार्यक्रमात हजेरी लावली. योवेळी ते बोलत होते. मी पुन्हा येईन म्हणालो होतो, पण दरम्यान सरकार गेलं. यामुळे मंगळवेढा उपसासिंचन योजना माझी वाट पाहत राहिली, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या एकप्रकारे मागील महाविकास आघाडी सरकारवर योजनेला राबवण्यात दिरंगाईसाठी जबाबदार धरले. मागील सरकारवर याचे खापर फोडले.

Devendra Fadanavis
आणि.. आम्ही करेक्ट कार्यक्रम केला : फडणवीसांनी मविआ'ला डिवचलं...

फडणवीस पुढे म्हणाले की, प्रामाणिकणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देऊ, अशी घोषणा मागच्या सरकारकडून करण्यात आली होती. मात्र ते घोषणा विसरले. आपल्या इथं एक म्हण आहे. मला या ठिकाणी कोणालाही लबाड म्हणायचे नाही, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, अशी अवस्था तेव्हा होती, असे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in