Solapur Politics : 'होय, दारूविक्रीचे गुन्हे असलेला आमचा पदाधिकारी मला भेटला,पण...'; शंभूराज देसाईंची जाहीर कबुली

Shivsena shinde Group news : शिवसेनेच्या शिंदे गटाचा मोहोळ तालुकाप्रमुख रामू भोसले याच्यावर गोवा पद्धतीची बनावट दारूविक्री केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सध्या फरारी आहे.
Shambhauraj Desai
Shambhauraj Desai Sarkarnama

Solapur News : होय, बनावट दारुविक्री प्रकरणी गुन्हे दाखल असलेला आमच्या पक्षाचा एक पदाधिकारी मला माझ्या घरी येऊन भेटला. पण, राज्यातील अनेक पदाधिकारी येऊन भेटतात. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाची आम्हाला त्याबद्दल कल्पना नसते. मात्र, अवैध धंद्यात अडकलेला कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टपणे बजावले. (I meet our office bearer who had liquor sales offences; Confession of Shambhuraj Desai)

शंभूराज देसाई हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरात माध्यमांशी बोलताना त्यांना मोहोळच्या शिवसेनेच्या शिंदे गटाचा तालुका प्रमुख रामू भोसले याच्या भेटीसंदर्भात प्रश्न विचारला, त्यावेळी मंत्री देसाई यांनी भोसले याच्या भेटीची कबुली देऊन कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.

Shambhauraj Desai
Madha Loksabha : पुन्हा दोस्ताना; संजय शिंदेंचा खासदारकीसाठी निंबाळकरांना पाठिंबा, अधिक मतांनी निवडून आणण्याचा निर्धार

शिवसेनेच्या शिंदे गटाचा मोहोळ तालुकाप्रमुख रामू भोसले याच्यावर गोवा पद्धतीची बनावट दारूविक्री केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सध्या फरारी आहे. मात्र, याच तालुकाप्रमुखाने शंभूराज देसाई यांना मंत्री पद मिळाल्यानंतर त्यांच्या निवास स्थानी जाऊन सत्कार केला होता.

Shambhauraj Desai
Ajit Pawar Group Vs Raut : अजित पवार गटाच्या इशाऱ्याने राऊत भडकले; ‘मला धमक्या देऊ नका, नाहीतर अंगावर कपडे राहणार नाहीत’

भोसले याच्या भेटीसंदर्भात देसाई म्हणाले की, सोलापुरातील आमच्या पक्षाचा एक पदाधिकारी, ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, तो माझ्या निवासस्थानी येऊन मला भेटला. मात्र, राज्यातील अनेक पदाधिकारी आम्हाला येऊन भेटतात, त्यामुळे भेटायला येणाऱ्या प्रत्येकाबद्दल आम्हाला कल्पना नसते. अवैध व्यवसायात अडकलेल्या आमच्या त्या संबंधित पदाधिकाऱ्यांवर किती गुन्हे आहेत, ते माहिती घेऊन त्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल.

Shambhauraj Desai
Ravikant Tupkar Way On BJP : रविकांत तुपकरही आता भाजपच्या वाटेवर; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची अप्रत्यक्ष कबुली

शासन आपल्या दारी कार्यक्रमावर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, आमचे शासन किमान घरी बसले नाही, हाच मुख्य फरक आहे. आमचे शासन थापा मारत नाही तर राज्यातील दीड कोटी जनतेला घरपोच लाभ दिले आहेत. ज्यांनी आमच्या सरकारवर टीका केली, ते घरात बसले होते आणि या सरकारचे मुख्यमंत्री लोकांच्या दारात जात आहेत.

दुष्काळात शंभूराज देसाई म्हणाले की, कॅबिनेट बैठकीत दुष्काळासंदर्भात चर्चा झाली आहे. राज्यातील जलसाठ्यातील पाणी पिण्यासाठी संरक्षित करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच, पिकांसाठी जिथे गरजेचे आहे, तिथे पाणी सोडण्याचेही आदेश दिले आहेत. दुष्काळाबाबत सरकार संवेदनशील आहे. जिथे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे, तिथे चारा डेपोसाठी निधी देण्यास सांगितले आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी तयार आहे.

Shambhauraj Desai
Beed Palak Mantri: बीडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे येणार; अजित पवारांची ग्वाही, धनंजय मुंडेंची लागणार वर्णी

इंडिया ही विरोधी पक्षाची आघाडी आहे. आमची महायुती आहे. आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. त्यांचं ते ठरवतील. ते लोगो काढत बसतील. मात्र, आम्ही आता कामाला लागलोय. आमचं ठरलंय २०२४ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ४५ खासदार आणि २२५ आमदार निवडून आणायचे टार्गेट आम्ही ठरवले आहे. काही लोकं लोगोमध्येच अडकलेले आहेत, त्यांना तिथेच राहू द्या, असा टोलाही देसाई यांनी विरोधी पक्षांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in