मला धनंजय आणि पंकजा मुंडे दोघेही सारखेच...

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांना भगवानगडावरील राजकीय मेळाव्याला विरोध करणारे नामदेव महाराज शास्ती यांच्या कीर्तनाला धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) उपस्थित होते.
Namdev Maharaj Shastri & Dhananjay Munde
Namdev Maharaj Shastri & Dhananjay MundeSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शिंदोरी या गावात संत भगवान बाबा यांच्या 88 व्या नारळी सप्ताह निमित्त काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनासाठी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) आले होते. या कार्यक्रमात भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन झाले. त्यानंतर महंत नामदेव महाराज शास्ती यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ( I like Dhananjay and Pankaja Munde both ... )

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना भगवानगडावरील राजकीय मेळाव्याला विरोध करणारे नामदेव महाराज शास्ती यांच्या कीर्तनाला धनंजय मुंडे उपस्थित होते. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या.

Namdev Maharaj Shastri & Dhananjay Munde
धनंजय मुंडे म्हणाले, मी भगवानगडाचा निस्सीम भक्त...

नामदेव शास्त्री महाराज यांनी सांगितले की, "मला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघेही सारखेच. मात्र जो जवळ येणार त्याच्यावर मी प्रेम करणार. भगवानबाबाचे दरवाजे दोघांसाठीही उघडे आहेत. मात्र गडावर राजकीय भाषण नाहीच. माझ्या सर्व चौकशा झाल्या. मला बदनाम करण्याचा मोठे षडयंत्र रचले गेले. मात्र मी घाबरत नाही. मंदिराचे काम सध्या सुरू आहे. त्या मंदिराला लागणारा दगड हे गोपीनाथ मुंडे देणार होते. मात्र दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. ते काम आज धनंजय मुंडे करणार आहेत", असे मत नामदेव शास्त्री महाराज यांनी व्यक्त केले.

रेणू शर्मा यांच्या अटके संदर्भात पत्रकारांना मंत्री धनंजय मुंडे यांना विचारले असता. ते म्हणाले, काळ आला होता. मात्र भगवान बाबा यांच्यामुळे वेळ आली नव्हती, असे म्हणताच धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com