गडाखांच्या सभेनंतर मला ताकद व हिंमत आली : आदित्य ठाकरे

शिवसंपर्क अभियाना अंतर्गत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) व माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आज अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले.
Aditya Thakre
Aditya ThakreSarkarnama

अहमदनगर - शिवसंपर्क अभियाना अंतर्गत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) व माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आज अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले. त्यांचे नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौका शिवसेनेचे युवा नेते उदयन गडाख, शिवसेनेचे अहमदनगर उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी पाऊस सुरू असूनही मोठ्या संख्येत शिवसैनिक जमले होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. ( I got strength and courage after the Gadakh meeting: Aditya Thackeray )

आदित्य ठाकरे म्हणाले, खुप वेळा आपले दुःख जास्त लोकांना सांगूही शकत नाही. सर्व शिवसैनिकांना धक्का बसला आहे. एवढे दिवस ज्या लोकांना आपण डोक्यावर नाचवल. प्रेम दिले, आशीर्वाद दिला, विश्वास दिला. यांच्या मतदानासाठी, प्रचारासाठी उतरलो होतो. हे लोक मोठे झाले मंत्री झाले. यांच्या सुखा-दुःखात आम्ही होतो. तरीही आमच्या पाठीत त्यांनी खंजीर का खुपसला हेच कळत नाही, असे त्यांनी सांगितले.

Aditya Thakre
Shivsena : अजून काय हवे होते ? भुमरेंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे कडाडले.

ते पुढे म्हणाले, मी उदयन व शंकरराव गडाख यांची सभा पाहिली. त्यानंतर मला ताकद व हिंमत आली, की असेही लोक आपल्या सोबत आहेत. तुमचे प्रेम पाहिले. आपली तशी दोन-अडीच वर्षांचीच ओळख आहे. तुमच्या आजोबांनीही माझ्या वडिलांना फोन करून सांगितले की 'घाबरू नका. तुम्ही जे करत आहात ते बरोबर करत आहात. तुम्ही काही कुणाचे वाईट केलेले नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत.' याला आशीर्वाद, प्रेम, महाराष्ट्र धर्म, हिंदुत्त्व म्हणतात, असे अभिमानाने त्यांनी सांगितले.

मागील अडीच वर्षांत आपण राज्यात कोणीही केले नाही एवढे काम केले आहे. कोविड काळात आपण जी काही काळजी घेतली. लोकांचे जीव वाचविले. त्याचे कौतुक जगाने केले आहे. मी जगात दोन परिषदांसाठी गेलो. तेथे लोकांनी सांगितले की, आम्हाला महाराष्ट्र व उद्धव ठाकरे माहिती आहेत. महाराष्ट्र मॉडेल सर्वांना माहिती आहे. महाविकास आघाडीचा पहिला निर्णय हा रायगडासाठी साडेसहाशे कोटी देण्याचा होता. तर शेवटचा निर्णय औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा होता. आपल्या पदाधिकाऱ्यांनी कोठेही जातीय-धार्मिक वाद वाढू दिला नाही. राज्यात सुख-समृद्धी होती. सगळे लोक एकत्र होते. हेच त्यांच्या पोटात दुखत असेल. कारण कुठेही दंगल झाली नाही, असा आरोप त्यांनी केला.

Aditya Thakre
शिवसेनेचा अखेर स्वबळाचा नारा; आदित्य ठाकरे लवकरच पुणे दौऱ्यावर!

महाराष्ट्रात सगळं चांगल चाललं आहे ते त्यांना रुचले नाही. आणि आपल्या गद्दारांना वाटले चला सूर मे सूर मिलाते है. ते गेले. ही गद्दारी होऊन महिना झाला. तरी कळत नाही आपण त्यांना काय कमी दिले, त्यांना असे काय मिळणार आहे, की यांचे जग बदलणार आहे. त्यांना मिळणाऱ्या आकड्यांची तुलना तुमच्या प्रेमाशी होणार नाही. हे प्रेम विकत मिळत नाही. हे प्रेम विकत मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Aditya Thakre
अनिल परबांचा फोन तपासा! भाजप-शिवसेना युती होणार होती की नाही, याचे उत्तर मिळेल...

महाराष्ट्र कधी गद्दारी खपवून घेत नाही

तिथे गेले त्याच्यावर काही दडपण असेल. तिथे रहायचे आनंदात रहा. हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. दाखवा तुम्ही काय काम केले. तुम्ही का गद्दारी केली, हे लोकांना पटवून द्या. महाराष्ट्र कधी गद्दारी खपवून घेत नाही आणि घेणारही नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in