Kolhapur : संजय मंडलिकांना मी दोन तास समजावले...?

सतेज पाटील Satej Patil म्हणाले, सध्या देशात country भाजपकडून BJP सुडबुध्दीचे राजकारण Common sense politics चालू आहे. ईडीची कारवाई ED action करून विरोधक संपवायचेच हे षडयंत्र आहे.
Sanjay Mandlik, Satej Patil
Sanjay Mandlik, Satej Patilsarkarnama

कोल्हापूर : जिल्ह्यात चांगले राजकारण करत सहकार, जिल्हा परिषद, सहकारी संस्थांत एकत्रितपणे काम करून जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू होता. एका प्रवृत्तीच्या विरोधात अख्खा कोल्हापूर जिल्हा पाच ते सात वर्षे लढा देत आहोत. पुन्हा या प्रवृत्तीच्या मांडीला मांडी लावून खासदार मंडलिक बसणार आहेत. त्यांना विनंती करून त्यांनी शिंदे गटात सामील झाले, पण जिल्ह्याच्या राजकारणात ते आमच्यासोबत राहतील, असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी एकनाथ शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला, याविषयी व शिवसेना, भाजपच्या नविन सरकारविषयी कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी एका वृत्तवाहिनीवर भाष्य केले. सतेज पाटील म्हणाले, महाराष्ट्रात अनेक स्थित्यंतरे होत आहेत, आता सर्वांनीच संयम बाळगणे गरजेचे आहे.

Sanjay Mandlik, Satej Patil
Video: आघाडीला धोका नाही, भाजपनेच आपले आमदार सांभाळावेत; सतेज पाटील

पुढील महिन्यात शिंदे गटाच्या आमदारांबाबत न्यायालयात काय निर्णय होतोय, यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. जी मंडळी गेली आहेत, त्यांची कोणतीही खात्री देता येत नाही. तसेच आगामी काळात भाजप त्यांना सामावून घेऊ शकते का नाही. तसेच या ४० आमदार व १२ खासदारांना भाजप आगामी निवडणुकात तिकिट देणार का, याबाबत स्पष्टता नाही. हा शिवसेना पक्षाचा विषय असल्याने भविष्यात काय घडेल आज सांगता येणार नाही. आज जे घडलं त्यांच्या विपरित ही घडू शकतं.

Sanjay Mandlik, Satej Patil
शिंदे गटाकडे जाणाऱ्या शिवसेना नेत्यांची गाडी अडकली कुठे ?

खासदार मंडलिक हे शिंदेगटात जाण्यापूर्वी मला भेटले. आमची दोन तास चर्चा झाली, त्यांनी सगळ्या गोष्टींची माहिती दिली. जिल्ह्यात आम्ही सर्वजण एकत्रितपणे चांगले राजकारण करत होतो. सहकार, जिल्हा परिषद, सहकारी संस्थांना एकत्रितपणे जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण, एका प्रवृत्तीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा पाच ते सात वर्षे लढा देत आहे. पुन्हा या प्रवृत्तीच्या मांडीला मांडी लावून ते बसणार आहेत.

Sanjay Mandlik, Satej Patil
राजकारणात नवा ट्विस्ट! खासदार संजय मंडलिक एकीकडं अन् मुलगा वीरेंद्र दुसरीकडं

त्यावर आम्ही त्यांना विनंती केली होती का हा निर्णय घेऊ नका. पण त्यांनी ऐकले नाही. आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात ते आमच्यासोबत राहतील याची खात्री आहे, असेही श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या नेत्यांवर सध्या ईडीची कारवाई केली जात आहे. याविषयी विचारले असता सतेज पाटील म्हणाले, सध्या देशात भाजपकडून सुडबुध्दीचे राजकारण चालू आहे.

Sanjay Mandlik, Satej Patil
पोटनिवडणुकीचा निकाल लागताच सतेज पाटील 'ड्रीम प्रोजेक्ट'साठी धावले!

ईडीची कारवाई करून विरोधक संपवायचेच हे षडयंत्र आहे. १२ वर्षांपूर्वी झालेल्या घटनेला आठ वर्षांनी उकरून काढली आहे. काँग्रेसने आता भारत जोडे अभियान सुरू केले आहे. त्यामुळे सोनिया गांधी, राहूल गांधी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. पवार साहेबांनी राष्ट्रपती निवडणूकीत विरोधकांची मोट बांधत असताना राष्ट्रवादीला टार्गेट केले आहे. महागाई, जीएसटी या मुद्दयापासून जनतेला विचलित करून वेगळेच काही तरी आणले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in