'दोषी आढळलो तर कुठल्याही कारवाईला माझी तयारी'

प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणात भाजपचे ( BJP ) केशव उपाध्ये ( Keshav Upadhye ) व बाळासाहेब मुरकुटे ( Balasaheb Murkute ) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांच्यावर टीका केली.
Shankarrao Gadakh
Shankarrao Gadakh Sarkarnama

अहमदनगर : अहमदनगर शहराजवळ प्रतीक बाळासाहेब काळे या 27 वर्षीय युवकाने 30 ऑक्टोबरला आत्महत्या केली होती. या प्रकरणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर टीका केली. या टीकेला गडाख यांनी उत्तर दिले आहे.

शंकरराव गडाख म्हणाले, आज जी पत्रकार परिषद उपाध्ये यांनी घेतली त्यातील सर्व आरोप खोटे आहेत. प्रतीक काळे या युवकाच्या बाबत जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. प्रतीक काळे हे यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजमध्ये कर्मचारी होते. माझा लहान भाऊ प्रशांत गडाख ही संस्था पाहायचे. त्या संस्थेचा व माझा लांबूनही संबंध नाही. दुर्दैवाने प्रशांत यांना सहा महिन्यांपूर्वी कोरोना झाला. तो आजपर्यंत मृत्यूशी झुंज देतो आहे. अजूनही तो हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. कालच माझी डॉक्टरांशी चर्चा झाली. त्याच्यावर अनेक उपचार सुरू आहेत.

Shankarrao Gadakh
प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री डोळे बंद करून बसलेत काय?

मंत्री गडाख पुढे म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी प्रशांत गडाख अॅडमिट झाल्यानंतर प्रतीक काळे डेंटल कॉलेजवर जायला लागला. त्यानंतर काही तरी तक्रारी झाल्या आणि पुढील दुर्दैवी प्रकरण घडले. तो काही माझा पीए नव्हता. मी त्याच्याशी साधे बोलतही नव्हतो. कधी माझी भेट होत असेल कारण अहमदनगरला तो का मावर होता. परंतु तो माझा पीए म्हणून अजिबात नव्हता. संस्थेत कामाला होता. सहा महिन्यांत तो कधी आमच्या घरीही आला नव्हता. कारण भाऊ आजारी असल्याने तो संस्थेतच जात होता.

अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण नेवासे तालुक्यात केले जात आहे. मोर्चे काढले जात आहेत. माझा कसलाही संबंध नसताना माझ्यावर विषारी टीका केली जात आहे. वेगवेगळे आरोप केले जात आहेत. परंतु आरोप करताना पुरावे दिले पाहिजेत. पुरावे दिले. मी दोषी आढळलो तर कुठल्याही कारवाईला माझी तयारी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Shankarrao Gadakh
बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरेंनी मंत्री शंकरराव गडाखांचा राजीनामा घ्यावा...

गडाखांनी सांगितले, की माझा प्रतीक काळेशी संबंध नव्हता. त्याचा मला अथवा माझा त्याला फोन झालेला नाही. या प्रकरणाची उपाध्ये यांना चौकशी करायची असेल तर त्यांनी प्रतीक काळेचा फोन पहावा. जर त्यांना त्यात काही दोषी आढळले तर पोलिस व सीआयडीच्या चौकशीची गरजच नाही. उपाध्ये यांनी केवळ फोन पाहून सांगावे. दोषी दिसल्यास मी थांबायला तयार आहे, असे मंत्री गडाख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com