Satara : मी शब्द पाळणारा आमदार; कदमांनी फुकटची काळजी करू नये : शिवेंद्रसिंहराजे

Eknath Shinde सातारा नगर पालिकेप्रमाणेच मेढा नगरपंचायतीच्या करवाढ आकारणीस स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पूर्वीच केली होती.
Amit Kadam, MLA Shivendraraje Bhosale
Amit Kadam, MLA Shivendraraje Bhosalesarkarnama

Medha News : वाढीव कर आकारणी रद्द करण्याबाबत सातारा नगरपरिषद आणि मेढा नगरपंचायतीची फाईल एकत्रच नगरविकास खात्याकडे गेल्या होत्या. सातारा नगरपरिषदेच्या करवाढ रद्द करण्याच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची अगोदर सही झाली. दोन चार दिवसांत मेढा नगरपंचायतीच्या Medha Nagarpanchayat फाईलवरही सही होईल. ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे. मी दिलेला शब्द पाळणारा आमदार आहे हे कृतीतून दाखवून दिले आहे. सातारा जावलीची जनता ही हे जाणते. तेव्हा अमित कदमांनी Amit Kadam फुकटची काळजी करू नये, असे प्रत्युत्तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी दिले आहे.

सातारा नगर पालिकेप्रमाणेच मेढा नगरपंचायतीच्या करवाढ आकारणीस स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पूर्वीच केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी सातारा प्रमाणेच मेढा नगरपंचायतीच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीस स्थगिती देण्याच्या तोंडी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या आणि त्याचवेळेपासून सदरची प्रक्रिया थांबली आहे.

शासनाकडून अधिकृत आदेश मिळण्यासाठी सातारा पालिका आणि मेढा नगरपंचायत असे दोन स्वतंत्र प्रस्ताव नगर विकास विभागाकडे दाखल करण्यात आले होते. दोन वेगवेगळ्या फाईल्स होत्या त्यात नगरविकास विभागाकडून सातारा पालिकेची फाईल आधी पोहचली. मेढा नगरपंचायतीची फाईलही नगरविकास विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आली आहे. ही एक प्रशासकीय कार्यालयीन प्रक्रिया आहे.

Amit Kadam, MLA Shivendraraje Bhosale
Medha : शिवेंद्रसिंहराजेंकडून मेढ्यातील रहिवाशांवर अन्याय : अमित कदम

त्यानुसार येत्या दोन- तीन दिवसात याही फाईलवर स्वाक्षरी होईल. मी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली असून मेढा नगरपंचायतीच्या कर आकारणी स्थगितीबाबत पुन्हा चर्चा झाली. त्यामुळे येत्या दोन- तीन दिवसात मेढ्याच्या कर आकारणीस स्थगिती मिळाल्याचे अधिकृत आदेश निघतील. मेढा नगरपंचायतीची चतुर्थ वार्षिक कर आकारणी सुनावणी प्रक्रिया यापूर्वीच स्थगित करण्यात आली आहे आणि नगर विकास विभागाकडून लवकरच तसे अधिकृत आदेश जारी होतील.

Amit Kadam, MLA Shivendraraje Bhosale
Satara : सुरक्षा रक्षकांच्या हक्कासाठी डॉ. येळगांवकर मैदानात; स्वतंत्र कामगार भवन मंजूर

त्यामुळे आमदारांनी शब्द पाळला नाही अशी आवई उठवत अमित कदमांनी फुकटची काळजी दाखवून जावलीतील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. दिलेला शब्द पाळणारा मी माणूस आहे, हे जावलीतील जनता, मतदार यांच्यासह अमित कदम यानांही चांगले माहिती आहे. त्यामुळे कोणत्याही बाबतीत अमित कदमांनी जावलीकरांची काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

Amit Kadam, MLA Shivendraraje Bhosale
Phaltan News: निरा देवघरचे पाणी व्हाया धोम बलकवडी येणार; रणजितसिंह निंबाळकरांचा करिष्मा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com