मलाही गुवाहाटीवरून फोन आला होता : गडाखांनी घेतला उद्धव ठाकरेंबरोबरच राहण्याचा निर्णय

शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांनी गडाख कुटुंब व त्यांचे कार्यकर्ते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच राहणार हे स्पष्ट केले.
Shankarrao Gadakh News Updates, Ahmednagar News in Marathi
Shankarrao Gadakh News Updates, Ahmednagar News in MarathiSarkarnama

अहमदनगर - शिवसेनेच्या राजकीय स्थित्यंतराच्या काळात शिवसेनेत अडीच वर्षांपूर्वी प्रवेश केलेल्या शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांनी त्यांच्या मतदार संघातील जनतेसमोर येत भूमिका मांडली. त्यांनी गडाख कुटुंब व त्यांचे कार्यकर्ते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच राहणार हे स्पष्ट केले. त्यामुळे जुने शिवसेनेचे आमदार, खासदार हे ठाकरेंना सोडत आहेत तर नवे निष्ठावान उद्धव ठाकरेंना सापडू लागले असल्याची राज्यात स्थिती आहे. Shivsena News Update

शंकरराव गडाख यांनी सांगितले की, ज्यांना बोटाला धरून मोठे केले त्यांनीच राजकारणाची पातळी सोडली. मलाही गुवाहाटीवरून फोन आले होते. मात्र मी गेलो नाही. आम्हालाही धाक दाखविण्यात आला मात्र मी हललो नाही. आम्ही त्यांच्या बरोबर गेलो नाही. सत्तेत असो नसो, मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार. मंत्रीपद गेल्यापेक्षा विकासकामे थांबल्याचे दुःख आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत नेवासे तालुक्यातील आठही जागा शिवसेनेला जिंकायच्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Shankarrao Gadakh News Updates, Ahmednagar News in Marathi
शंकरराव गडाख म्हणाले, हा हल्ला म्हणजे मला राजकारणातून संपविण्याचा कट

ते पुढे म्हणाले की, मी एका परिस्थितीत शिवसेने बरोबर आलो. मी अपक्ष होतो. निवडून आल्यावर कामकाज करत असताना अनेक अडचणी उद्धव ठाकरे यांना आल्या. पक्ष फुटला. याचे वाईट वाटते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Shankarrao Gadakh News Updates, Ahmednagar News in Marathi
यशवंतराव गडाखांनी संकटाला कसे नमवले.... शंकरराव गडाख यांनी सांगितला अनुभव

मी उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच राहण्याचा ठाम निर्णय घेतला होता. त्यामुळे मी राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना व शिवसेना पुरस्कृत उमेदवारांना मतदान केले. तसेच विधानसभा अध्यक्ष निवड व विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com