संजय शिंदेंचे कट्टर समर्थक, राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा उपाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

बोबडे यांच्या प्रवेशामुळे टेंभुर्णी शहर परिसरात कॉंग्रेस पक्षाला पुन्हा उभारी येण्याची आशा निर्माण झाली आहे.
Hrishikesh Bobade Join Congress
Hrishikesh Bobade Join CongressSarkarnama

टेंभुर्णी (जि. सोलापूर) : करमाळ्याचे आमदार संजय शिंदे (sanjay shinde) यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) सोलापूर जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष ऋषिकेश बोबडे यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात (Congress) प्रवेश केला. बोबडे यांचा काँग्रेस प्रवेश हा संजय शिंदे यांच्याबरोबच आमदार बबनराव शिंदे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. (Hrishikesh Bobade, a staunch supporter of MLA Sanjay Shinde, has joined the Congress)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये टेंभुर्णी येथील ऋषिकेश बोबडे यांचा पक्षप्रवेशाच कार्यक्रम झाला. माढा तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना पक्षाचे उपाध्यक्षांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष सोडल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. बोबडे यांच्या प्रवेशामुळे टेंभुर्णी शहर परिसरात कॉंग्रेस पक्षाला पुन्हा उभारी येण्याची आशा निर्माण झाली आहे.

Hrishikesh Bobade Join Congress
एकनाथराव, त्या २५ आमदारांची यादी द्या; सरकार कसे बनवायचे, हे मी सांगतो : मुनगंटीवार

ऋषिकेश बोबडे हे करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी ते काम करत होते. मात्र, मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता, त्यामुळे ऋषिकेश बोबडे हे कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याविषयी त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता होती. त्यांनी काँग्रेस पक्षाचा हात हाती घेतल्याने त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Hrishikesh Bobade Join Congress
छत्रपती कारखाना जिंकण्यासाठीच राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांनी हा डाव टाकला : जाचकांचा आरोप

ऋषिकेश बोबडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या वेळी पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, माढ्याच्या नगराध्यक्षा व सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षा मीनल साठे, प्रा. संदीप साठे, अण्णासाहेब शिंदे, आण्णासाहेब इनामदार, अभिषेक कांबळे, रामभाऊ वाघमारे, दीपकराव खोचरे, सतीश पालकर, सुधीर रास्ते, अमरजित पाटील, प्रताप जगताप, गौरव एकतपुरे, इम्रान बागवान आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com