यशवंतराव गडाखांनी संकटाला कसे नमवले.... शंकरराव गडाख यांनी सांगितला अनुभव

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख ( Yashwantrao Gadakh ) यांनी कोरोना सारख्या गंभीर संकटावर मात करत संकटालाही कसे नमवले.
Yashwantrao Gadakh
Yashwantrao GadakhSarkarnama

अहमदनगर - माजी खासदार आणि अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख ( Yashwantrao Gadakh ) यांनी कोरोना सारख्या गंभीर संकटावर मात करत संकटालाही कसे नमवले याचा अनुभव राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) सांगितला. ( How Yashwantrao Gadakh coped with the crisis .... Shankarrao Gadakh shared his experience )

अहमदनगर येथील गुलमोहर रस्त्यावरील कोहिनूर मंगल कार्यालयात आज (मंगळवारी) प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या ‘मी मेलो त्याची गोष्ट’ या कांदबरीचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, अभिनेते मोहिनीराज गटणे, ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सुधाकर शेलार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष किशोर मरकड आदी उपस्थित होते.

Yashwantrao Gadakh
शंकरराव गडाख म्हणाले, पारनेरकरांनी मंत्री पदाची संधी हुकवली...

कोरोना या संकटावरील शेतकऱ्यांचे चित्रण करणारी ही कांदबरी असल्याचा धागा पकडत मंत्री शंकरराव गडाख यांनी वडील व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी कोरोनासारख्या गंभीर संकटावर कशी मात केली. याचा अनुभव कथन केला. ‘‘साहेबांची तब्बेत फारच बिघडली होती. हार्टरेट पूर्णतः खाली आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी काळजी करणाऱ्या बाबी सांगत यातून सहजपणे बाहेर येणे शक्य नसल्याचे सांगितले होते.

Yashwantrao Gadakh
यशवंतराव गडाख म्हणाले, मिठाच्या खड्यापासून सर्वांनी सावध रहा

ते पुढे म्हणाले, सारे कुटूंबीय काळजीत होते. दोन दिवस तब्बेत गंभीर पण स्थीर होती. तिसऱ्या दिवशी तब्बेत सुधारली आणि साहेब गंभीर संकटातून बरे झाले. या साऱ्या बाबी पाहून डॉक्टरही अवाक झाले होते. माणुस कितीही मोठा असला तरी संकटाला सामारे जावे लागते. सत्ता, पैसा, पद याला काहीही महत्व नाही. हे कोरोनाने दाखवून दिले. संकटात जशी लोकांनी माणुसकी दाखवली अशीच माणुसकी भविष्यातही संकट काळात दाखवायला हवी, असे मंत्री गडाख यांनी सांगितले.

डॉ. संजय कळमकर म्हणाले, कोरोना काळातील अनेक वाईट अनुभव आले. लोक आता त्याची चर्चा करतात. मी कादंबरीतून हे सारे सामाजीक अनुभव, शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी व इतर बाबी या कादंबरीतून मांडल्या आहेत असे लेखक डॉ. संजय कळमकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in