पावसाळ्यात निवडणुका कश्या घेणार? : थोरातांचा सवाल

सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांत राज्यातील जिल्हा परिषदा व महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
पावसाळ्यात निवडणुका कश्या घेणार? : थोरातांचा सवाल
Balasaheb ThoratSarkarnama

मुंबई - राज्य सरकारने ओबीसी आरक्षण होईपर्यंत जिल्हा परिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय विधीमंडळात घेतला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज हा निर्णय रद्द करत दोन महिन्यांत राज्यातील जिल्हा परिषदा व महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. यावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी कोकण व सह्याद्री परिसरातील भागांत मान्सूनमध्ये निवडणुका कश्या घ्यायचा असा प्रश्न उपस्थित करत निर्णयाचा चेंडू राज्य निवडणूक आयोगाच्या गोटात लोटला आहे. ( How to hold elections in rainy season? : Thorat's question )

बाळासाहेब थोरात म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. प्रत्यक्ष निर्णय वाचल्यावरच काही गोष्टी स्पष्ट होतील. मात्र जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका दोन महिन्यांत जाहीर कराव्यात असे सांगितले आहे. या निवडणुकांत मान्सूनच्या पावसाची मोठी अडचण आहे. मान्सून सुरू झाल्यावर कोकण आणि काही जिल्ह्यांमध्ये ते शक्य नाही. या शिवाय शेतीची कामे ही सुरू होत असतात. शेतकरी वर्ग ज्यावेळी कामात असतो. त्यावेळी निवडणुका कशा होतील. याचा निर्णय शेवटी राज्य निवडणूक आयोगाकडे आहे. त्यानुसार ते योग्य तो निर्णय घेतील.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यघटना मोडित काढण्याचे काम सुरू...

ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतरच घेण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. यावर बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विचारात घेऊनच काही निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये आमच्या सर्वपक्षीय बैठका झाल्या आहेत. त्यामुळे आता कोणतेही दोष देण्याचे कारण आहे असे मला वाटत नाही. आयोग त्यावर काम करत आहे.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, महागाईवरुन लक्ष वळविण्यासाठी हनुमान चालिसाचा वाद

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया नंतर राज्य सरकार म्हणून आम्ही एकत्र बसलो मंत्रीमंडळाची बैठक झाली, चर्चा झाली असे काही नाही. लवकरच चर्चा होईल. मात्र निर्णय राज्य निवडणूक आयोगालाच घ्यावा लागणार आहे. मुंबई व कोकणात जो पाऊस चालतो त्यात निवडणुका घेणार कशा? अडचणी असल्या तरी तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्याचे विश्लेषण राज्य निवडणूक आयोग करेल, असे मंत्री थोरात यांनी स्पष्ट केले.

Balasaheb Thorat
कोल्हापूरच्या जनतेने भाजपच्या धर्मांध राजकारणाला नाकारले... बाळासाहेब थोरात

राज ठाकरें विषयी...

सरकार म्हणून अल्टीमेटम दिलं जाऊ शकत नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले पाहिजे, या दृष्टीने शासन काम करत आहे. भोंगा नाही काहींना राजकारण महत्त्वाचे वाटते. शिर्डीला काकड आरती लाऊडस्पीकरवर झाली नाही. अनेक सण-उत्सव, जागरण, गोंधळाचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम असतात. या भोंग्याच्या राजकारणामुळे सरकार बँकफुटवर गेल्याच वाटत नाही. कुणी शांतता-सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असेल तर आम्ही सक्षम आहोतच, असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांनी नाव न घेता लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.