Satara News : पृथ्वीराज चव्हाणांच्या मागे किती आमदार; त्यांनी आत्मपरिक्षण करावे...शंभूराज देसाई

Shambhuraj Desai: कोणी भाजपच्या जवळ जात असेल तर त्याचा महायुतीवर परिणाम होणार नाही, असेही शंभूराज देसाई म्हणाले.
Prithviraj Chavan, Shambhuraj Desai
Prithviraj Chavan, Shambhuraj Desaisarkarnama

Satara News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे स्वत:च्या पक्षाचे ५० आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांच्या पाठीमागे किती आमदार आहेत. याचे त्यांनी आत्मपरिक्षण करावे. मग, आमच्या नेत्याविषयी बोलावे, असा सल्ला सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी दिला आहे.

कराडला पत्रकार परिषदेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना भाजप दुधातल्या माशी सारखं फेकून देणार आहे. हे योग्य नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणारी ही चर्चा आहे. त्या पदाचा मान राखला गेला पाहिजे, अशी टिपण्णी केली होती. यावर सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना सल्ला दिला आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे स्वत:च्या पक्षाचे ५० आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीमागे किती आमदार आहेत. याचे त्यांनी आत्मपरिक्षण करावे.

जो नेता ५० आमदार व १३ खासदार आपल्या सोबत ठेवतो, त्याचे नेतृत्व एकमुखी मानतात, त्याच्याबद्दल बोलणे योग्य नाही. त्यांनी आपल्या पाठीमागे किती आमदार, खासदार आहेत ते एकदा सांगावे, असा टोला त्यांनी लगावला.

Prithviraj Chavan, Shambhuraj Desai
Shambhuraj Desai News: ''आमचं 'टार्गेट' सेट,पण अजित पवारांसारखा मोठा नेता...''; देसाईंचं मोठं विधान

कोणी भाजपच्या जवळ जात असेल तर त्याचा महायुतीवर परिणाम होणार नाही. आगामी काळात बहुमत सिद्ध करण्याची गरज असेल तर १८० ते १८६चा आकडा आम्ही गाठू शकतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेला डावलण्याचा विषय नाही. असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com