लाकडी-निंबोडी योजनेस मी विरोध कसा करू : राष्ट्रवादी आमदार मानेंच्या भूमिकेने संतापाची भावना!

प्रस्तावित योजनेसाठी ३४८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांत मोठा असंतोष पसरला आहे.

लाकडी-निंबोडी योजनेस मी विरोध कसा करू : राष्ट्रवादी आमदार मानेंच्या भूमिकेने संतापाची भावना!
Yashwant ManeSarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : इंदापूर (indapur) तालुक्यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून (Ujani Dam) पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रस्तावित योजनेसाठी ३४८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांत मोठा असंतोष पसरला आहे. त्यातच मोहोळचे (Mohol) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांनी ‘लाकडी निंबोडी ही योजना जुनीच असून या योजनेस मी विरोध कसा काय करणार,’ असे वक्तव्य केल्याने सोलापूर (solapur) जिल्ह्यात विशेषतः मोहोळ मतदारसंघात सिंचनाची अनेक कामे रखडलेली असल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. लाकडी-निंबोडी योजनेसाठी उजनीतून उचलण्यात येणारे पाणी तातडीने रद्द करण्याची मागणी सर्वपक्षीयांकडून होत आहे. त्यासाठी आंदोलनांच्या माध्यमातून जिल्ह्यात रान पेटले आहे. (How can I oppose Lakdi-Nimbodi scheme : MLA Yashwant Mane)

इंदापूर तालुक्याचे रहिवासी असलेले मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांना लाकडी-निंबोडी योजनेबाबत विचारले असता, ते म्हणाले की, ‘ही योजना जुनीच आहे, त्यामुळे त्याला आपण विरोध कसा करू शकतो,’ अशी संदिग्ध आणि गुळमुळीत भूमिका घेतली. त्यामुळे त्यांचा या योजनेला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची चर्चा मोहोळमध्ये जोर धरू लागली आहे. महिनाभरापूर्वी लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाणी देण्यासाठी ३४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, त्यामुळे ‘आमच्या हक्काचे पाणी इंदापूर आणि बारामती येथे नेण्यात येत आहे,’ अशी भावना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊन मोठा असंतोष पसरला आहे. ही योजना रद्द करण्यात यावी, यासाठी सोलापूर जिल्ह्यात आंदोलने करण्यात येत आहेत.

Yashwant Mane
बिगूल वाजला : राज्यातील १३ महापालिकांमधील आरक्षण सोडत ३१ मे रोजी!

याबाबत आमदार माने म्हणाले की, लाकडी निंबोडी या योजनेचा सध्या माझा अभ्यास सुरू आहे, त्यामुळे मी आज काही बोलू शकत नाही, असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. या योजनेसाठी पाणी देणार असतील तर मी काय करणार. मी कॉलेजला असताना या योजनेला मंजुरी मिळाली होती, त्यासाठी मी समर्थन करत नाही, त्यामुळे या योजनेला मी विरोध तरी कसा करणार, अशी ‘नरो वा कुंजरोवाची’ भूमिका त्यांनी घेतली.

Yashwant Mane
संभाजीराजेंबाबत जो खेळ लावण्यात आलाय, तो थांबवा; अन्यथा... : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

या बाबत लाकडी-निंबोडी या प्रकल्पाला मंजुरी असल्याचे पत्र दाखवा, असे म्हणताच त्यांनी २००१ मधील पत्र दाखवले त्यामध्ये चक्क लाकडी निंबोडी (प्रस्तावित) 00.५७ पाणी राखीव असा एका रकान्यात लिहिलेला उल्लेख आहे. त्या बाबत त्यांना प्रस्तावित असलेल्या या योजनेला ३४८ कोटी रूपये मंजूर केले. पण, मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा, शिरापूर उपसा सिंचन योजनेसह पोखरापूर तलावात पाणी सोडणे, सीना-भोगावती जोड कालवा आदींची कामे सुरु होऊन निधीअभावी रखडली आहेत. आतापर्यंत सरकारने निधी दिला नाही. मात्र, प्रस्तावित असलेल्या या योजनेला ३४८ कोटी रुपये मंजूर केले, हे काय गौडबंगाल आहे आणि हा मोहोळ तालुक्यावर सरळ अन्याय आहे असा सवाल त्यांना केला.आमदार माने यांनी शिताफीने उत्तर देण्याचे टाळून त्यांनी या सर्व योजनांसाठी निधीची उपलब्धता केली असून २०२४ पर्यत सर्व कामे पूर्ण होणार आहेत, असे सांगितले.

Yashwant Mane
ही दोस्ती तुटायची नाय...कट्टर विरोधक माने-जाधव १६ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर!

या वेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कल्याणराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष शौकत तलफदार, राजेश सुतार, आनंद गावडे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in