Ashok Shingare
Ashok ShingareSarkarnama

उधारीसाठी सदाभाऊ खोतांना अडविणाऱ्या हॉटेल चालकास वाळूचोरीप्रकरणी अटक

पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे एका घरासमोर अवैधरित्या वाळू खाली करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना खबऱ्याकडून मिळाली होती.

सोलापूर : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना अडवून हॉटेलमधील जेवणाच्या उधारीचे पैसे मागणारे अशोक शिनगारे याला पंढरपूर (Pandharpur) पोलिसांनी अटक (arrest) केली आहे. न्यायालयाने त्याला १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, खोत यांना उधारीसाठी अडविल्याचे प्रकरण राज्यभरात गाजले होते. त्याचवेळी दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप झाले होते. (Hotel driver who intercepted Sadabhau Khot for food bill arrested for sand theft)

पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथे एका घरासमोर अवैधरित्या वाळू खाली करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांचे एक पथक जाधव यांनी त्या ठिकाणी तातडीने पाठवले. त्यावेळी वाळू खाली करून वाहन घेऊन जात असताना चालक अशोक सुखदेव शिनगारे, तुषार राजेंद्र सलगरे (दोघेही रा. मांजरी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली.

Ashok Shingare
अब्दुल सत्तारांना फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीतच झापले; ‘तो निर्णय तुम्ही जाहीरच कसा केला?’

पोलिसांनी त्यावेळी अशोक शिनगारे याला पकडले. मात्र त्याचा जोडीदार तुषार सलगरे हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. शिनगारे याच्यासह वाळूचा ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे. न्यायालयाने शिनगारे याला १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Ashok Shingare
मी तर चोरांचा सरदार... : कृषिमंत्र्यांचे अजब विधान!

पंचायत राज समिती सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी हॉटेलचालक अशोक शिनगारे यांनी माजी मंत्री खोत यांना पंचायत समितीच्या आवारात अडविले होते. ‘अगोदर माझी उधारी द्या; मगच पुढे जावे’ असेही त्यांनी सदाभाऊंना सांगितले होते. एकाकी घडलेल्या या प्रकारामुळे खोत यांची कोंडी झाली होती. मात्र, त्यांनी त्याच रात्री पत्रकार परिषद घेत अशोक शिनगारे यांच्यावर वाळूचोरीचे आरोप केले होते. तसेच, त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, असे म्हटले हेाते. या सर्व प्रकारामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंके असल्याचा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला होता. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते.

Ashok Shingare
सरकार कोसळल्यानंतर शरद पवार प्रथमच घेणार महाविकास आघाडीची बैठक

शिनगारे हा वाळूचोर आहे, हे सिद्ध : हळणवर

दरम्यान, अटकेनंतर भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर यांनी शिनगारे याच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सांगोला तालुक्यातील अशोक शिनगारे हा वाळूचोर आहे, हे सिद्ध झाले आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याने शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची बदनामी करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याने खोत यांना सांगोला येथे हॉटेलचे बिल बुडवल्याचा आरोप करत कांगावा केला होता. त्यावेळी माढा लोकसभा निवडणुकीत सदाभाऊच्या कुठल्याही सहकाऱ्याने ढाब्यावर जेवण केले नव्हते, याचा साक्षीदार मी स्वतः आहे. आम्ही शेतकऱ्यांची पोरं घरची भाकरी बांधून प्रस्थापितांच्या विरोधात लढत होतो. प्रचारासाठी पैसा नव्हता. अगदी आमच्या गाड्या डिझेलमुळे रस्त्यातच काही वेळा बंद पडायच्या, कोणी तरी डिझेल दिल्यावर मग प्रचार चालू व्हायचा. ती निवडणूक शेतकऱ्यांनी हातात घेतली होती. सधन शेतकरी मदत करायचे. गरिब शेतकरी प्रचार करायचे. मग, ढाब्यावर जेवण कसं करणार, अशी परिस्थिती होती.

Ashok Shingare
राष्ट्रवादीला दणका : शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त; काळेंना वर्षातच सोडावे लागले पद

सदाभाऊ हे पवार कुटुंबाच्या विरोधात बोलतात, आंदोलन करतात म्हणून सांगोल्याच्या दीपक साळुंकेंनी षडयंत्र रचून हा प्रकार करायला लावला होता, त्यावेळी आम्ही हा माणूस खोटं बोलतोय, गुन्हेगार, वाळूचोर आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, असे सांगत होतो. शिनगारे याच्या अटकेने ते सिद्ध झाले आहे, असेही हळणवर यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com