लॉन्ड्री चालकाने दाखविला प्रामाणिकपणा : 10 लाखांचे सोन्याचे दागिने केले परत

इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांच्या पिशवीत एका लॉन्ड्री चालकाला सोन्याचे दागिने व पैसे सापडले.
Rajendra Pipada and Mamta Pipada felicitating the laundry owner
Rajendra Pipada and Mamta Pipada felicitating the laundry ownerSarkarnama

मोबीन खान

अहमदनगर - इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांच्या पिशवीत एका लॉन्ड्री चालकाला सापडलेले सुमारे 10 लाख रुपायांचे सोन्याचे दागिने तसेच 20 हजार रुपायांची रोख रक्कम त्याने संबंधित ग्राहकाला परत केली. त्याच्या या कृतीने प्रामाणिकपणा आजही शिल्लक असल्याचे उत्तम उदाहरण बघायला मिळाले. ( Honesty shown by the laundry driver: Gold ornaments worth 10 lakhs returned )

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात ही घटना घडली आहे. मनात कुठलाही मोह न बाळगता लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांनी सापडलेले तब्बल दहा लाख रुपायांचे दागिने व रोख रक्कम, निरपेक्ष भावनेने ग्राहकास परत केली आहे. सोने, पैसा, संपत्ती यांचे आकर्षणा पायी भ्रष्ट झालेल्या सध्याच्या युगात राजेश वाघमारे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जग कितीही बदलले तरी प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे, नीतिमत्ता व प्रामाणिकपणा आजही जगात शिल्लक आहे याचा अनुभव राहाता शहरात बघायला मिळाला.

Rajendra Pipada and Mamta Pipada felicitating the laundry owner
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात लोखंडेंच्या विरुद्ध घोलपांच्या उमेदवारीचे संकेत

शहरातील लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांच्याकडे एका ग्राहकाने पिशवी भरून कपडे इस्त्रीसाठी आणले होते. कामाच्या व्यस्ततेमुळे दोन-तीन दिवस या पिशवीतील कपडे इस्त्री करणे वाघमारे यांना शक्य झाले नाही. त्यानंतर तिसऱ्या दिवशी इस्त्रीसाठी पिशवीतील कपडे बाहेर काढत असताना राजेश वाघमारे यांना त्या पिशवीत एक छोटीशी कापडी थैली आढळून आली. यामध्ये सोन्याची कर्णफुले, नथ, बांगड्या व इतर दागिने तसेच रोख रक्कम वीस हजार रुपये आढळून आली. वाघमारे यांनी लागलीच याबाबतची माहिती संबंधित ग्राहकाला फोन द्वारे दिली व दुकानात येऊन आपले सोन्याचे दागिने तसेच रक्कम घेऊन जाण्याची विनंती केली.

संबंधित ग्राहकाला आपल्या पिशवीत सुमारे दहा लाख किमतीचे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपये होते याची पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती. असे असताना सुद्धा या लॉन्ड्री चालकाने आपली प्रामाणिकता दाखवत सोन्याचे दागिने व पैशाचा कुठलाही मोह न ठेवता ग्राहकाला परत देऊन टाकले. याबद्दल वाघमारे यांच्या निकटवर्तीयांना कळताच ही बातमी शहरभर पसरली. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी लॉन्ड्री चालक वाघमारे यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक केले. तर संबंधित ग्राहकाने देखील त्यांचे आभार मानलेत.

Rajendra Pipada and Mamta Pipada felicitating the laundry owner
बंगळुरूचे 178 साईभक्त अडकले शिर्डी विमानतळावर

लॉन्ड्री हा आमचा पारंपारिक व्यवसाय असून आई-वडिलांनी पहिल्यापासून अतिशय चांगले संस्कार व प्रामाणिकपणाची शिकवण दिली आहे. त्यामुळे सोने, नाणे, पैसा यापेक्षाही नीतिमत्ता व व्यवसायातील प्रामाणिकपणा हा खूप किमती असून याची बरोबरी कशातच होऊ शकत नाही. कष्टाचा रुपया आपल्या सत्कारणी लागेल परंतु हरामाचा आपल्याला कधीच पुरणार नाही. त्यामुळे कष्टाच्याच पैशाला व कष्टाने घेतलेल्या वस्तूला आमच्या कुटुंबात स्थान असल्याची भावना लॉन्ड्री चालक राजेश वाघमारे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in