गृहमंत्री वळसे पाटील आणि उदयनराजेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या पुण्यतिथीनिमत्ति वळसे पाटील हे सातारा येथे आले होते.
गृहमंत्री वळसे पाटील आणि उदयनराजेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ
Dilip Walse-Patil & Udyanraje Letest NewsSarkarnama

सातारा : आजच्या धावपळीच्या युगात वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या लग्नसराईचे तसेच यात्रा, जत्रांचे दिवस असल्याने नागरिकांची वाहनांच्या माध्यमातून ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु असते. पण सातारा शहरामध्ये विशेषत: एसटी बस स्टॅण्डसह मुख्य चौकात वाहतूक व्यवस्था ही सातत्याने विस्कळीत होत आहे. ती सुरळीपणे सुरु रहावी, तसेच गुन्हेगारी नियंत्रणाबाबत आपण त्यामध्ये लक्ष घालावे, अशी अपेक्षा भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje) यांनी करताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनीही याबाबत लवकरच संबंधितांना सूचना केल्या जातील, असे आश्वासन दिले. मात्र, या भेटीने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. (Dilip Walse-Patil & Udyanraje Letest News)

Dilip Walse-Patil & Udyanraje Letest News
काँग्रेसच ठरलं; आता नाना पटोले जाणार अयोध्येला

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या पुण्यतिथीनिमत्ति वळसे पाटील हे सातारा येथे आले होते. त्यावेळी शासकीय वश्रिामगृह येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीबाबत बोलताना गृहमंत्री वळसे पाटलांनी सांगितले की, सातारा शहरातील वाहतुकीच्या संदर्भात खासदार उदयनराजेंनी भेट घेतली आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याबाबत वळसे पाटीलांनी नाराजी व्यक्त केली. औंध पोलीस स्टेशनच्या लॉकपमधून पाच दरोडेखोरांनी पोलिसांना मारहाण करून पळून गेल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. यामधील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले असल्याचे सांगत महिलांवर वाढत्या अत्याचाराबाबत पोलिसांना सूचना दिल्याचे गृहमंत्री वळसे पाटलांनी सांगितले.

Dilip Walse-Patil & Udyanraje Letest News
ती वक्तव्ये विनोदी... अशा वक्तव्यांना लोक गांभीर्याने घेत नाहीत...शरद पवार

दरम्यान, नवनीत राणा या कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलू नये, याबाबत काय सांगाल असे विचारले असता गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, नवनीत राणा यांच्या वक्तव्याबाबत आता न्यायालयच निर्णय घेईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.