High Court : 'महाविकास'च्या काळातील कामे सुरु करण्याचे आदेश... पृथ्वीराज चव्हाण

Gujrat गूजरात मतदानानंतर नरेंद्र मोदींनी Narendra Modi मीडियाला प्रतिक्रिया दिली तसेच रोडशो ही केला. या माध्यमातून अप्रत्यक्षपणे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansarkarnama

कऱ्हाड ः महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात ८५० कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर त्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आली. सर्वोच्य न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकाराने या कामांना दिलेली स्थगिती ही चुकीची आहे, संबंधित कामे सुरु करावी, असा आदेश दिला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिली.

आमदार चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात ८५० कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर त्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आली. हे प्रकरण सर्वोच्य न्यायालयात गेले. त्यावर सर्वोच्य न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकाराने या कामांना दिलेली स्थगिती ही चुकीची आहे, असा आदेश देवुन कामे सुरु करावी, असा आदेश दिला आहे.

सत्तेवर असलेल्या सरकारने लोकंच्या हिताचा विचार करुन विकास कामे मंजुर केलेली असतात. त्यामुळे कोणत्याही सरकारने जनतेच्या हितासाठी मंजुर केलेली विकास कामे करण्यामध्ये सत्तेवरील सरकारने अडथळा आणु नये. नव्या सरकाराने नवीन कामे करावी. मात्र जुनी कामे दिली असताना, त्यास विधीमंडळाने मंजुरी देवुन ती कामे बजेटमध्ये आलेली असतानाही ती कामे थांबवने योग्य नव्हते. त्यामुळे सर्वोच्य न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. त्यानुसार आता संबंधित जुनी कामे सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांची चांगली सोय होण्यास मदत होणार आहे.

Prithviraj Chavan
Satara : कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबई, नागपूर मागायचे राहिलेत...पृथ्वीराज चव्हाण

ते म्हणाले, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मतदान केले. तो त्यांचा अधिकार आहे. मतदानानंतर नरेंद्र मोदी यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली तसेच रोडशो ही केला. या माध्यमातून अप्रत्यक्षपणे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला. सर्व निवडणुका पक्षपातीपणे झाल्या पाहिजेत. हे सर्वांना वाटत असून लोकशाहीचे ते मूळ सूत्र आहे. गुजरातमधील घडामोडीकडे निवडणूक आयोग पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या समोर निमूटपणे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत होते. खरे तर या प्रकारामुळे नरेंद्र मोदी व अमित शहा यांना गुजरातच्या निवडणुकीबद्दल चिंता वाटत असल्याने घडला असावा, असेही त्यांनी सांगीतले.

Prithviraj Chavan
Karad : सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली हे वास्तवच...पृथ्वीराज चव्हाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com