हेरवाड गावाने घेतला देशाला दिशा दाखवणारा निर्णय; हा आदर्श महाराष्ट्रभर घेतला जावा!

महिला आयोग्याच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केले निर्णयाचे स्वागत
हेरवाड गावाने घेतला देशाला दिशा दाखवणारा निर्णय; हा आदर्श महाराष्ट्रभर घेतला जावा!
Herwad village important decisionsarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) हे सामाजिक परिवर्तनाची भूमी आहे. याची प्रचिती जिल्ह्यातील हेडवाड या गावाने दिली आहे. गावातील विधवांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा महत्वपूर्ण ठराव ग्रामसभेने पारित केला आहे. पतीच्या निधनानंतर स्त्रीच कुंकू पुसले जाते, तिच्या हातातील बांगड्या फोडल्या जातात, मंगळसूत्र तोडले जाते आणि जोडवी काढली जातात. ही प्रथा आता हेडवाडमध्ये बंद करण्यात आली आहे.

हेरवाड (ता. शिरोळ) या गावच्या ग्रामसभेने विधवा प्रथा बंदीचा महत्तवपूर्ण निर्णय घेतला आहे. गावचे सरपंच सुरगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव पारित करण्यात आला आहे. सौ. मुक्ताबाई संजय पुजारी या ठरावाच्या सूचक असून सौ. सुजाता केशव गुरव यांनी त्याला अनुमोदन दिले. हा ठराव मांडताना गावातल्या सर्वच नागरिकांनी एकजुटीने त्याला पाठिंबा दिला, असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Herwad village important decision
पवार म्हणाले;...पण ते काही आम्हाला जमलं नाही

या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्वीट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्या आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, ''राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा सांगणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या 'विधवा प्रथा बंद' या निर्णयाचे मी स्वागत करते. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवणारे विचार दिले आहेत. हेरवाड या गावाने महाराष्ट्रासह देशाला दिशा दाखवणारा निर्णय घेतला आहे. आगामी काळात हेरवाडचा आदर्श महाराष्ट्रभर घेतला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करते.'' असे चाकणकर यांनी म्हटले आहे.

Herwad village important decision
मला माहित नाही हे अयोध्येत जाऊन काय करतात; जयंत पाटलांचा ठाकरेंना टोला

हेरवाड गावाने केलेल्या ठरावामध्ये म्हटले आहे की ''आपल्या समाजात पतीच्या अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, असे प्रकार केले जातात. महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या प्रथेमुळे महिलांच्या अधिकारावर गदा येते आहे. यामुळे कायद्याचा भंग होतो. विधवांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी हेरवाड गावामध्ये विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. तशा प्रकारचा ठराव मंजूर करुन परिपत्रकही काढण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.