शंभूराज देसाईंनी निष्ठावंत कार्यकर्त्याला दिली नववर्षाची अनोखी भेट!

कार्यकर्त्याला घडवली मुंबई ते पाटण हेलिकॉप्टरची ट्रीप
शंभूराज देसाईंनी निष्ठावंत कार्यकर्त्याला दिली नववर्षाची अनोखी भेट!

Shambhuraj Desai

sarkarnama

तारळे (जि. सातारा) : शिवसेना (shivsena) नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे कायम चर्चेत असतात. त्यांच्या साधेपणाची चर्चा केवळ पाटणमध्ये नव्हे, तर राज्यभरात होत असते. कार्यकर्त्यांसमवेत टपरीवर बसून ते कधी चहा पितात, तर कधी फळीवर बसून ते वडापावाचा आस्वादही घेतात. देसाई हे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अनेक गोष्टी करत असतात, याची उदाहारणे मोठी आहेत. अशीच एक असामान्य घटना सामान्य कार्यकर्त्याच्या नशिबी आली आहे. (Helicopter trip made by Shambhuraj Desai to the activist)

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे तारळे विभागातील निष्ठावंत कार्यकर्ते अभिजित पाटील हे हिवाळी अधिवेशनात कामानिमित्त मुंबईला गेले होते. तेथे मंत्री देसाई यांनी त्यांची अगत्याने विचारपूस करून थांबवून घेतले. शंभूराज देसाई यांनी नाताळला स्वतःच्या कुटुंबीयांसमवेत पंचतारांकित ताज हॉटेलमध्ये कुटुंबातील सदस्यांप्रमाणे पाटील यांना नेऊन प्रीतीभोजन केले. मुंबईत तीन दिवसांची त्यांची निवासाची सोय करून पाटणला आपण मिळून जाऊ, असे सांगत शंभूराज देसाई यांनी पाटील यांना थांबवून ठेवले.

<div class="paragraphs"><p>Shambhuraj Desai</p></div>
भाजपचे आमदार जयकुमार गोरे म्हणतात, ‘मी अजितदादांचा फॅन’

अभिजित पाटील यांना आर्श्चयाचा धक्का बसला तो मुंबईहून पाटणला निघताना. कारण गृहराज्यमंत्री देसाई यांनी आपल्या हेलिकॉप्टरमधूनच पाटणला जायचे असल्याचे सांगितले. पाटील यांना तो सुखद धक्का होता. देसाई यांनी विट्याचे आमदार अनिल बाबर यांच्यासमवेत त्यांना हेलिकॉप्टरमध्ये घेऊन हवाई सफर करत विट्याकडे कूच केली.

<div class="paragraphs"><p>Shambhuraj Desai</p></div>
राज्यमंत्री भरणेंची ऑफर आमदार जयकुमार गोरे स्वीकारणार का?

बोलून न दाखवता कार्यकर्त्याचे मन ओळखून शंभूराज देसाई यांनी दिलेली नववर्षाच्या आगमनातील हवाई सफरीची ही भेट अविस्मरणीय होती. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे कार्यकर्त्याला मिळणारे प्रेम हीच खरी कार्यकर्त्याची ताकद आहे, अशी प्रतिक्रिया अभिजित पाटील यांनी या हवाईसफरीनंतर दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in