Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama

Solapur News : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जावयास अटक

जयसिंह चक्रपाणी गुंड हे ग्रामविकास अधिकारी आहेत.

सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे थोरले बंधू कालिदास सावंत यांचे जावई जयसिंह चक्रपाणी गुंड (रा. अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांच्यासह चौघांवर मोहोळ पोलिस ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा (Crime) दाखल झाला असून त्याच दिवशी मध्यरात्री त्यांना अटक झाली आहे. (Health Minister Tanaji Sawant's son-in-law arrested)

आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे आहेत. सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्यासह पाच भावांचे त्यांचं कुटुंबीय आहे. यातील थोरले बंधू कालिदास सावंत यांची मुलगी अनगर (ता. मोहोळ) येथील जयसिंह चक्रपाणी गुंड यांना दिलेली आहे.

Tanaji Sawant
Supreme Court Hearing : ठाकरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव न आणणे हा कटाचा भाग, त्यातूनच बंडखोर गुजरात-आसामला गेले

जयसिंह चक्रपाणी गुंड हे ग्रामविकास अधिकारी आहेत. त्यांचा मुलगा प्रथमेश जयसिंह गुंड यांचा अनगरमध्ये छोटासा व्यवसाय आहे. सहा महिन्यांपूर्वी आमची मका लवकर खरेदी का करत नाही; म्हणून जयसिंह चक्रपाणी गुंड, प्रथमेश जयसिंह गुंड, जयवंत महादेव थिटे, अक्षय राजेंद्र कारमकर या चौघांनी गावातील एकास शिवीगाळ केली होती, त्याबाबतचा गुन्हा त्यांच्यावर मोहोळ पोलिसांत दाखल केला आहे.

Tanaji Sawant
Supreme Court Hearing : राज्यपालांच्या भूमिकेवर घमासान : सरन्यायाधीशांचे सवाल; कपिल सिब्ब्लांचा जोरदार युक्तीवाद

या गुन्ह्याला १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी झालेल्या बाचाबाची प्रकाराची पार्श्वभूमी आहे. दरम्यान, राजकीय वैमनस्यातून जयसिंह गुंड व प्रथमेश गुंड यांना मारहाण झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com