पवारांच्‍या भेटीसाठी उताविळ असायचा; त्यांच्या नखाचीही सर महेश शिंदेना नाही...

रयत शिक्षण संस्‍थेच्‍या Rayat Shikshan Sanstha अध्‍यक्षपदाच्‍या President मुद्यावरुन कोरेगावचे आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांनी खासदार शरद पवार Sharad Pawar यांना उद्देशून टीका करण्‍यास सुरवात केली आहे. या टीकेचा समाचार सुभाष शिंदे Subhash Shinde यांनी पत्रकाव्‍दारे घेतला आहे.
Mahesh Shinde, Shubhash Shinde
Mahesh Shinde, Shubhash Shindefacebook

सातारा : राष्‍ट्रवादी काँग्रेसचे संस्‍थापक खासदार शरद पवार हे देशातील थोर नेते आहेत. त्‍यांच्‍यावर टीका करण्‍याएवढी तुमची उंची नसून कर्मवीरांनी स्‍थापलेल्‍या रयत शिक्षण संस्‍थेचा इतिहास आणि त्‍यातील पवार कुटुंबियांच्‍या योगदानाची माहिती घेण्‍याचा सल्‍ला फलटण येथील राष्‍ट्रवादीचे ज्‍येष्‍ठ नेते सुभाष शिंदे यांनी पत्रकाव्‍दारे आमदार महेश शिंदे यांना दिला आहे. राष्‍ट्रवादीतून जिल्‍हा परिषद सदस्‍य म्‍हणून निवडून आल्‍यानंतर शरद पवार यांची भेट घेण्‍यासाठी तुम्‍ही उतावीळ असायचा, अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे.

याच पत्रकात राष्‍ट्रवादीतून जिल्‍हा परिषद सदस्‍य म्‍हणून निवडून आल्‍यानंतर शरद पवार यांची भेट घेण्‍यासाठी तुम्‍ही उतावीळ असायचा. हा उतावीळपणा बघून त्‍यांची दिल्‍ली येथे भेट घडवून आणत एक तास चर्चा घडवून आणल्‍याच्‍या घटनेची आठवणही त्‍यांनी आमदार महेश शिंदे यांना करुन दिली आहे. रयत शिक्षण संस्‍थेच्‍या अध्‍यक्षपदाच्‍या मुद्यावरुन कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी खासदार शरद पवार यांना उद्देशून टीका करण्‍यास सुरवात केली आहे. या टीकेचा समाचार सुभाष शिंदे यांनी पत्रकाव्‍दारे घेतला आहे.

Mahesh Shinde, Shubhash Shinde
पवारांवर टीका करण्यापुर्वी आपली उंची तपासा ; शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेवर हल्लाबोल

सुभाष शिंदे यांनी म्‍हटले की, कर्मवीर ज्‍या-ज्‍यावेळी 'रयत'च्‍या कामासाठी बारामती येथे जात असत, त्‍या-त्‍या वेळी ते शारदाबाई पवार यांची भेट घेत असत. त्‍यावेळी त्‍यांनी पाच हजारांची मदत कर्मवीरांना केली होती. तेव्‍हापासून पवार कुटुंबिय आणि 'रयत'चे संबंध आहेत. 'रयत'च्‍या घटनेत कुठेही मुख्‍यमंत्री अध्‍यक्ष असावा, असा उल्‍लेख नाही.

Mahesh Shinde, Shubhash Shinde
`रयत शिक्षण` आम्हा सातारकरांच्या ताब्यात हवी : आमदाराची थेट मागणी

इतिहासाची, घटनेची माहिती न घेता उचलली जीभ लावली टाळ्याला अशी कृती तुम्‍ही करत आहात. डिस्‍कळ येथील तुमच्‍या कारखान्‍याचे उदघाटन त्‍यावेळी शरद पवार यांच्‍याच हस्‍ते झाले होते. देशभरातील प्रमुख नेते शरद पवार यांचा सल्‍ला घेत असताना त्‍यांच्‍याबद्दल अशी वक्‍तव्‍ये करणे तुम्हाला शोभत नाही. हे न थांबल्‍यास जिथे असला तिथे गाठून वेगळ्या पध्‍दतीने उत्तर मिळेल, असा इशाराही श्री. शिंदे यांनी पत्रकाव्‍दारे दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com