'तो त्रिवेदी शिवाजी महाराजांबद्दल बोललायं..'; संभाजीराजे फडणवीसांवर भडकले...

Sambhajiraje : फडणवीसांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचं का समर्थन केलं जातंय हे कळत नाही.
Sambhajiraje Chhatrapati, Devendra Fadnavis Latest News
Sambhajiraje Chhatrapati, Devendra Fadnavis Latest NewsSarkarnama

पुणे :छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सर्वत्र संतापाची तीव्र लाट उसळली आहे. विरोधीपक्षांकडून सुद्धा सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं म्हणत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. आता फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतरही माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पावित्रा धारण केला असून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार आगपाखड केली आहे.

Sambhajiraje Chhatrapati, Devendra Fadnavis Latest News
तिकिटे विकण्याच्या आरोपावर केजरीवालांनी मौन सोडलं..भाजपला दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...

छत्रपती संभाजीराजे यांनी परभणी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप (Bjp) प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याने ओढवलेल्या वादावर भाष्य केलं. संभाजीराजे म्हणाले, या राज्यपालांना महाराष्ट्रात ठेवू नका,पंतप्रधानांनी ज्या राज्यात कोश्यारींना पाठवायचे असेल तिथं पाठवावं. मात्र महाराष्ट्रात ठेऊ नये आणि कोश्यारींना शक्य तितक्या लवकर महाराष्ट्राबाहेर काढावं.तसेच त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांनाही माफी मागायला लावावी.शिवरायांच्या इतिहासाची जी मोडतोड सध्या सुरु आहे त्याविरोधात आवाज उठविणारा देखील मीच होतो, असेही संभाजीराजेंनी ठणकावून सांगितले.

Sambhajiraje Chhatrapati, Devendra Fadnavis Latest News
Imtiaz Jalil : तर भाजपने यापुढे शिवाजी महाराजांचे फोटो, पुतळे आपल्या कार्यक्रमात ठेवू नयेत..

ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांविषयी सातत्याने वादग्रस्त विधाने केले जात आहेत. मी मागेही राज्यपालांना हटवण्याची मागणी केली होती आणि आताही मी पंतप्रधानांकडे हीच मागणी केली आहे.मी कधी लपून-छपून किंवा कुणाच्या आडून बोलत नाही.माझी भूमिका ही नेहमी परखड असते. मात्र, फडणवीसांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचं का समर्थन केलं जातंय हे कळत नाही. पण मी त्या देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगतो, तो त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केली आहेत म्हणजे आहे. त्यांना लवकरात लवकर माफी मागायला लावावी.

काय म्हणाले होते सुधांशु त्रिवेदी?

वीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असं राहुल गांधी वारंवार सांगताहेत. मात्र,प्रस्तावित फॉरमॅटबाहेर पडण्यासाठी माफी मागायचे.छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील पाचवेळा औरंजेबाला पत्र लिहिलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच गदारोळ माजला आहे. समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com