मी आमदारावर बोलावे इतका तो मोठा नाही...

भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ), राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले समर्थकांत लढत आहे.
मी आमदारावर बोलावे इतका तो मोठा नाही...
Madhukar pichadSarkarnama

अकोले ( जि. अहमदनगर ) - अकोले नगर पंचायतची निवडणूक सध्या सुरू आहे. यात भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ), राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले समर्थकांत लढत आहे. त्यामुळे या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आज मधुकरराव पिचड यांनी डॉ. किरण लहामटे यांच्यावर टीका केली. He is not big enough for me to speak on MLA.

अकोले नगरपंचायतच्या निवडणुकीतील भाजपच्या प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार हितेश कुंभार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माजी मंत्री पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी वस्ताद चंदन बोऱ्हाडे होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांध समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ, अॅड. वसंतराव मनकर, जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे डी आंबरे, बाजार समितीचे माजी सभापती सुधाकर देशमुख, आर पी आय चे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सरोदे ,माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, माजी नगरसेवक परशराम शेळके, भाऊसाहेब साळवे, मैनुद्दीन शेख, प्रतिभा मनकर, शीतल वैद्य, सागर चौधरी, धनंजय संत, मच्छिंद्र मंडलिक, रमेश चौधरी, अन्सार शेख, नाजीम शेख आदी उपस्थित होते.

Madhukar pichad
मधुकरराव पिचड यांनी आमदार लहामटे यांना हे केले मोठे आव्हान

मधुकरराव पिचड म्हणाले, अकोले तालुक्यात आपण निर्मितीचे काम केले हे विरोधकांना दिसत नाही पण जनतेला चांगले माहिती आहे. तालुक्याच्या आमदारावर मी बोलावे इतका आमदार मोठा नाही, अशी टीका मधुकरराव पिचड यांनी केली.

पिचड पुढे म्हणाले की, संगमनेर बारी हा अकोले शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गाचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केले. दोन वर्षात यांनी एखादा बंधारा तरी बांधला का ? असा सवाल त्यांनी आमदार डॉ लहामटे यांचे नाव न घेता केला. मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने गोरगरीब जनतेसाठी मोफत धान्य दिले ते धान्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी चोरतात. यासारखे दुसरे दुर्दैव नाही. अकोले तालुक्यातील जनतेने मला 7 वेळा निवडून दिले. माझा जसा वैभव मुलगा तसाच हितेश हा देखील माझा मुलगाच आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये हितेश कुंभारला मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

Madhukar pichad
मला या वयात रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका - मधुकरराव पिचड

शिवाजी धुमाळ यांनी सांगितले की, 1 लाख 15 हजार मते मिळवून ते विजयी झाले. जे त्यांच्यासाठी काम करत होते ते आज घरी आहेत. आता सर्व स्वार्थी व लबाड त्यांचे जवळ असल्याची घनाघाती टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.