Hasan Mushrif News: मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होणार; ईडीच्या कारवाईनंतर सहकार विभागाचाही 'हा' महत्वपूर्ण आदेश

Kolhapur District Central Co-operative Bank: भाजप नेते किरीट सोमय्या यांचा टि्वटद्वारे हसन मुश्रीफांवर निशाणा...
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama

Maharashtra Politics: माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सहकार विभागाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंदर्भात महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेली तक्रार व ईडीच्या कारवाईनंतर आता जिल्हा बँकेचीही चौकशी केली जाणार आहे. या संबंधी सहकार विभागाने महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.

सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना व ब्रिस्कसंदर्भात झालेल्या तक्रारी आणि त्याबाबत बँकेने दिलेली कागदपत्रे यामध्ये स्पष्ट तपशील लेखापरीक्षण अहवालात नसल्याचा ठपका जिल्हा उपनिबंधकांनी आपल्या अहवालात ठेवला आहे. याच धर्तीवर डी. टी. छत्रीकर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (लेखापरीक्षण) यांची चौकशीसाठी लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

चाचणी लेखापरीक्षण करून त्याच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह व संबंधित कागदपत्रांसह अहवाल लवकरात लवकर सादर करावा असे आदेश विभागीय सहनिबंधकांनी दिले आहेत.

Hasan Mushrif
Maharashtar Budget Session : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प : लोकप्रिय घोषणा होणार? काय आहेत शक्यता?

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सरसेनापती संताजी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला तसेच ब्रिस्क फॅसिलिटीज् कंपनीला दिलेल्या कर्जासंबंधी तसेच शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या रकमांचा व बँकेचा संबंध आहेत का या तीन बाबींचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. त्यामुळे बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात टि्वट केलं आहे. या टि्वटद्वारे सोमय्या यांनी पुन्हा एकदा हसन मुश्रीफांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकचे विशेष लेखापरीक्षण करण्यासाठी डी. टी. छत्रीकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

तसेच 39 हजार 53 शेतकर्‍यांच्या नावे प्रत्येकी 10 हजार रुपयांची मुदतठेव ठेवण्यात आली आहे का? या मुदत ठेवीच्या अनुषंगाने, हसन मुश्रीफ परिवार, ब्रिस्क कंपनी व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला 40 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे का? हसन मुश्रीफ यांच्या परिवाराशी संबंध असं टि्वटमध्ये किरीट सोमय्या (Kirit Somaiya)म्हणाले आहेत.

Hasan Mushrif
Maharashtra Assembly Session : ''तुम्ही जर आमच्यासोबत गुवाहाटीला..''; मंत्री सामंतांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला टोला

ईडीने जिल्हा बँकेविरोधात ईडीने केलेल्या कारवाईबाबत किरीट सोमय्या यांनी दि. 8 फेब्रुवारी 2023 रोजी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. यामध्ये 39 हजार 53 शेतकर्‍यांच्या नावे प्रत्येकी 10 हजार रुपये मुदतठेव विशिष्ट काळासाठी घेण्यात आली आहे त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. या सर्व तक्रारींची आणि कागदपत्रांची खातरजमा करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी 28 फेब्रुवारी रोजी जिल्हा बँकेला भेट दिली होती.

त्याविषयी त्यांनी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. नाबार्ड तपासणी अहवाल व वैधानिक लेखापरीक्षणाचा अहवालही सादर करून त्यांनी कर्जमाफी योजनेतून कोणती रक्कम शेअर्सपोटी वर्ग केली नसल्याचे स्पष्ट केले होते.

Hasan Mushrif
Yashomati Thakur : "माझ्या पतीला जाऊन १८ वर्षे, मंत्री राहिलेल्या महिलेची ही अवस्था तर.." ; ठाकूरांना अश्रू रोखता आले नाहीत!

तसेच शेतकर्‍यांना मिळालेल्या कर्जमाफीचा लाभ व त्या रकमेचा घोरपडे कारखान्याशी असलेल्या आर्थिक सहसंबंधाची फेरतपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. यामुळे मुश्रीफ यांच्यासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे.

मुश्रीफ यांची उच्च न्यायालयात धाव...

कोल्हापूर येथील मुरगूड पोलिसांनी २३ फेब्रुवारी रोजी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र,फसवणुकीच्या आरोपाखाली कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुश्रीफ यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकवण्यासाठी आणि अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) ससेमिरापाठी लावण्यासाठी हेतुपुरस्सर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी तो रद्द करण्याची मागणी करताना केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com