Hasan Mushrif ED Raid: हसन मुश्रीफांच्या घरातून 'ईडी'ला काय मिळालं?

Hasan Mushrif News: साखर कारखान्यातील 158 कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आरोप
Hasan Mushrif :
Hasan Mushrif :Sarkarnama

Hasan Mushrif ED Raid News: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर व त्यांच्या संबंधित अनेक ठिकाणांवर ईडीचे धाडी टाकले आहेत. साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे सुरू आहेत, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि आयकर विभागाने (ITD) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी आणि इतर काही ठिकाणी पहाटे धाडी टाकण्यात आले. भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात आले आहेत.

Hasan Mushrif :
Hasan Mushrif : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी

तपास अधिकाऱ्यांनी घरातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली :

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी हसन मुश्रीफांवर साखर कारखान्यातील 158 कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आरोप लावला होता, मोठी बेहिशोबी मालमत्ता जमवली होती. सुमारे दोन डझन ईडी-आयटीडी अधिकाऱ्यांच्या पथकांनी हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरच्या कागल शहरातील घरातून काही कागदपत्रे आणि इतर पुरावेही जप्त केल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत :

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांनी लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, गेल्या काही आठवड्यात ईडीने राष्ट्रवादी नेत्यांच्या जवळच्या काही लोकांवर छापे टाकले होते. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे तिसरे नेते आहेत, ज्यांच्यावर ईडीने छापा टाकला आहे. याशिवाय ठाकरे गटासह संजय राऊत यांच्या जागेवरही विविध तपास यंत्रणांनी कारवाई केली होती.

Hasan Mushrif :
Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांनी सर्व आरोप फेटाळले, शिंदे फडणवीस सरकारला दिलं खुलं आव्हान

हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर समर्थक जमा झाले :

हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर सध्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. तपास यंत्रणांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बुधवारी त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी करत ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in