हसन मुश्रीफांनी घेतल्या चक्क दोन म्हशी..

माजी मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी स्वतः 2 म्हैशी विकत घेतल्या आहेत.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama

Hasan Mushrif : गोकुळ दूध संघाच्या म्हैशीच्या दुधाला मुंबई, पुणेत मोठी मागणी आहे त्यामुळे गोकुळच्या वतीनं शेतकऱ्यांनी म्हशीच दूध उत्पादन वाढवावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी स्वतः 2 म्हैशी विकत घेतल्या आहेत.

राज्यातील सर्वात मोठा दूध संघ असलेल्या कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या म्हैशीच्या दुधाला मुंबई, पुणे, नाशिक अशा ठिकाणी मोठी मागणी आहे. गोकुळकडं मोठ्या प्रमाणात म्हैशीचं दूध येते मात्र तरीही ते अपुर पडत आहे. त्यातच गुजरातच्या अमूलन राज्यात हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे.

Hasan Mushrif
हसन मुश्रीफ-घाटगे वाद पेटला... राष्ट्रवादीचे मोर्चा काढून उत्तर

लोकांची वाढती मागणी आणि अमूलच आव्हान यामध्ये गोकुळ कुठं कमी पडू नये असा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात म्हैशी खरेदी करून दूध उत्पादन वाढवावे यासाठी विविध योजना गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या वतीने आखण्यात येत आहेत.

Hasan Mushrif
हसन मुश्रीफ यांनी नाक दाबल्याने धुळ्याचे भाजप नेते कासावीस!

या प्रोत्साहनाबरोबर आम्हीही म्हैशी पाळतो असा संदेश जावा म्हणून हसन मुश्रीफ यांनी दोन म्हैशी विकत घेऊन त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुश्रीफाकडे अगोदर आठ म्हैशी आहेत आता आणखी दोन म्हशी घेऊन आता दहा म्हैशीचा गोठा त्यांनी केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांनीही म्हैशी खरेदी करून दूध उत्पादन वाढवावं असे आवाहन केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com