घाटगेंना कशाला महत्व देताय? मी सहा निवडणुका जिंकलोय..

Hasan Mushrif Vs Samarjitsinh Ghatge संघर्ष आतापासूनच सुरू
Hasan Mushrif, Samarjeet Ghatge
Hasan Mushrif, Samarjeet Ghatgesarkarnama

कोल्हापूर : Kolhapur News राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातील (Kagal Taluka) राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. विधानसभा निवडणूक 2024 ला होणार आहे, मात्र आताच आरोपप्रत्यारोप आणि आव्हान प्रतिआव्हान रंगू लागले आहे.

Hasan Mushrif, Samarjeet Ghatge
'शिंदे गट म्हणजे शिवसेना आणि ठाकरे यांचा उद्धव गट'

कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे (Samarjitsinh Ghatage) एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. हसन मुश्रीफ यांनी समरजीतसिंह घाटगे निधी अडवण्यासाठी मुंबईला हेलपाटे मारत असल्याची टीका केली त्यावर घाटगे यांनी तुम्ही दाऊदशी संबंध असलेल्या नवाब मालिकांना सोडवण्यासाठी मुंबईच्या येरझाऱ्या घालता, अशी टीका करुन आपण हसन मुश्रीफ यांना पाडूनच आमदार होणार असल्याच आव्हान दिलं.

Hasan Mushrif, Samarjeet Ghatge
MNS News: अमित ठाकरे यांच्या दौऱ्यात ‘वन टू वन’ चर्चा

मुश्रीफ यांनी निवडणूक अजून दोन वर्षांनी आहे, लोकशाहीत कोणीही लढू शकत पण मी आतापर्यंत सहा निवडणुका जिंकल्या ही सातवी निवडणूक असेल घाटगे यांच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नसल्याच म्हटलं. आगामी काळात घाटगे - मुश्रीफ संघर्ष वाढत जाण्याची चिन्ह आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com