हसन मुश्रीफ म्हणाले, नीलेश लंके राज्यातील उमलते नेतृत्त्व...

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) पारनेरचे ( Parner ) आमदार नीलेश लंके ( MLA Nilesh Lanke ) यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे, अशातच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 Hasan Mushrif .jpg
Hasan Mushrif .jpgSarkarnama

पारनेर ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पारनेरचे आमदार नीलेश लंके यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे, अशातच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. Hasan Mushrif said, Nilesh Lanke's boiling leadership in the state...

वाघुंडे येथे सुमारे 60 लाख रूपये खर्च करून तयार केलेल्या ग्रामसचिवालयाचे लोकार्पण तसेच विविध उदघाटन कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. या वेळी आमदार नीलेश लंके, अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाअध्यक्ष बाबाजी तरटे, सरपंच रेश्मा पवार, माजी सरपंच संदीप मगर, उपसरपंच मंगल मगर, पुनम मुंगशे, संध्या औटी, कारभारी पोटघन, सचिन पठारे, राजू शिंदे, राजू शेख, मनिषा मगर, बाबासाहेब मगर, राजू मगर, सचिन पवार, भाऊसाहेब भोगाडे आदी उपस्थित होते.

 Hasan Mushrif .jpg
नीलेश लंके म्हणतात, सर्वांना चीत करण्याची ताकद आमच्यात...

हसन मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात सर्व तरूण आमदार दिले आहेत. त्यात पारनेर-नगरसाठी नीलेश लंके सारखे उमलते नेतृत्व आता तालुक्या पुरते मर्यादित राहिले नसून ते आता राज्याचे उमलते नेतृत्व झाले आहे. पक्षाची ताकद विकास कामाच्या माध्यमातून वाढवायची आहे.

मुश्रीफ पुढे म्हणाले, या फक्त एक हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या गावाने विविध विकास कामे करूण इतर गावांपुढे आदर्श व निर्माण केला आहे. मी या पुढेही या गावाला अधिकचा निधी देणार आहे. राजकारणात इर्षा असावी मात्र मतभेद नसावेत. राज्याचा 50 टक्के निधी केवळ ग्रामस्वच्छता व पाणी पुरवठ्यावर केला जातो असेही ते म्हणाले.

 Hasan Mushrif .jpg
सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढाईच्या सेमीफायनलची तयारी जोरात

या वेळी लंके म्हणाले, पारनेर तालुक्याच्या विकासकामांच्या निधीत पालकमंत्र्यांचा मोठा वाटा आहे. या छोट्या गावाने एक आदर्श ग्रामसंसद उभारली आहे या गावासाठी दत्त मंदिर परिसरत सभामंडपासाठी निधी दिला जाईल, असे लंके यांनी सांगितले. यावेळी प्रास्तविक रेश्मा पवार यांनी केले. माजी सरपंच संदीप मगर, संध्या औटी व तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांचीही भाषणे झाली.

 Hasan Mushrif .jpg
हसन मुश्रीफ म्हणाले, आमच्याकडे शीट, विखेंकडे बॅलन्स...

दोषींवर कडक कारवाई

जिल्हा रुग्णालयात काल घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती नेमली आहे. त्यात दोषी असणारांना सोडले जाणार नाही. कडक कारवाई केली जाईल.

- हसन मुश्रीफ, पालकमंत्री.

कोविडचे दोन डोस घेतले नाहीत त्यांना...

राज्यात कोरोनामुळे सुमारे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही. यासाठी नियम पाळा. दोन डोस ज्यांनी घेतले नाही अशा शेतकऱ्यांचे ऊस तोडू नका. मजुरांना कामावरही घेऊ नका, असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com