मुश्रीफसाहेबांनी आम्हाला मृत्यूच्या दारातून परत आणले!

अपघातात जखमी झालेल्या कुटुंबाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली मदत
Navid mushrif
Navid mushrifSarkarnama

मुरगूड (जि. कोल्हापूर) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेब (Hasan Mushrif) यांनी आम्हाला साक्षात यमाच्या दारातून सुखरुप परत आणले आहे, अशी कृतज्ञतेची भावना मुरगूडच्या अपघातग्रस्त लोकरे कुटुंबीयांनी व्यक्त केली. मुंबईतील (Mumbai) उपचारानंतर हे कुटुंब सुखरूप मुरगूडला घरी परतले आहे. त्यानंतर नवीद मुश्रीफ यांनी भेटून या कुटुंबीयांची विचारपूस केली. (Hasan Mushrif Saheb brought us back through the door of death!)

मुरगूडच्या लोकरे कुटुंबातील पती-पत्नींसह मुलगी असा तिघांच्याही अपघाताची कहाणी तितकीच हृदयद्रावक आहे. महिन्यापूर्वी सूर्यकांत साताप्पा लोकरे (वय ५१), त्यांच्या पत्नी सरिता (वय ४७), व मुलगी सानिका (वय १९) हे तिघे घरगुती कामानिमित्त मोटरसायकलीवरून कोल्हापूरला चालले होते. इस्पूर्लीजवळ त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. यात गंभीर दुखापत होऊन तिघेही बेशुद्ध पडले होते.

Navid mushrif
शिवसेना नेत्यांची चंद्रकांत पाटलांसोबत खलबते!

रणजित सूर्यवंशीना ही माहिती समजताच तातडीने तिघांनाही पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी इस्पितळात दाखल केले. लोकरे यांच्या फुफ्फुसाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी फुटली होती तसेच त्यांचा डावा पायही दोन ठिकाणी फॅक्चर झाला होता. सरिता लोकरे यांचा उजवा हात व डावा पाय फॅक्चर झाला होता, मुलगी सानिकाच्या डोक्याला मार लागल्यामुळे मेंदूला सूज आली होती. तिघेही दुसऱ्या दिवशीच शुद्धीवर आले. मुंबईतील उपचाराकामी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नवीद मुश्रीफ यांनी नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी यांच्याकडे पाठपुरावा करून अगदी सुटीच्या दिवशीही गवळी यांनी कागदपत्रांची पूर्तता करून दिली होती.

Navid mushrif
राष्ट्रवादीमुळे वेल्ह्याला तब्बल २५ वर्षांनंतर मिळणार दोन संचालक!

कार्डियाक ॲम्बुलन्सपासून १५ लाखांचे मोफत उपचार!

लोकरे यांची चिंताजनक स्थिती व उपचाराच्या भल्यामोठ्या खर्चाची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिली. मंत्री मुश्रीफ यांनी तातडीने त्यांना कार्डियाक ऍम्ब्युलन्स करून कोल्हापूरमधून मुंबईला ‘हिरानंदानी’ या हॉस्पिटलला हलविले. तिथे त्यांच्यावर फुफ्फुसाला रक्तपुरवठा करणाऱ्या फुटलेल्या रक्तवाहिनीच्या किचकट व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर डाव्या पायाच्या दोन्ही शस्त्रक्रियाही यशस्वीरित्या पार पडल्या. त्यासाठीचा १५ लाखांहून अधिक खर्चाचे उपचार अगदी मोफत झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com