Hasan Mushrif : कर्नाटक पोलिसांनी हसन मुश्रीफ यांच्यावर उगारली काठी : सीमाभागात तणावाचे वातावरण!

Hasan Mushrif : कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी मुश्रीफांना त्याना अडवले.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama

Hasan Mushrif : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे हिवाळी अधिवेशनात सीमावादाच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असताना, बेळगावमध्ये सीमाभागातही आता वातावरण पेटताना दिसत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सीमाभागात मोर्चाचे आयोजन केले आहे. बेळगावमध्ये होणाऱ्या मराठी भाषकांच्या महामेळाव्यासाठी निघालेल्या माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी काठी उगारली, यामुळे या भागात आता तणावाचे वातावरण आहे.

Hasan Mushrif
Winter Session : माता आणि आमदार, दोन्ही कर्तव्य तेवढेच महत्वाचे…

कोगनोळी टोल नाक्यावर तणाव निर्माण झाला :

मराठी भाषकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बेळगावमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सामील होण्यासाठी कोल्हापूरमधून अनेक नेते रवाना होण्याच्या तयारीत होते. मात्र बेळगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्र एकीकरण समितिच्या कार्यर्त्यांची या ठिकाणी कर्नाटक पोलिसांकडून धरपकड होत आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते, हसन मुश्रीफ यांच्यावर कर्नाटक पोलिसांकडून लाठी उगारली.

Hasan Mushrif
Winter Session : बोम्मईंच्या नावे खोटं टि्वट करण्यामागे कोण, सगळं कळलंय; मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा कोणाला?

माजी मंत्री हसन मुश्रीफ हे बेळगावकडे कार्यकर्त्यासह निघाले होते, मात्र कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी त्याना अडवले. यावेळी मोठा गदारोळ झाला.पोलिसांनी हसन मुश्रीफ यांच्यावर काठी उगारल्याने तणाव निर्माण झाला होता.यावेळी मुश्रीफ यांनी कर्नाटकच्या पोलिसांच्या मुजोरीचा निषेध केला.माझे मराठी बांधव अडचणीत असताना मी अधिवेशनाला कसा जाऊ, कर्नाटक सरकारला त्यांची जागा दाखवूच, असा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com