Hasan Mushrif अडचणीत ; ईडीच्या चौकशीनंतर कोल्हापूर जिल्हा बॅंकेची नाबार्डकडून चौकशी..

Hasan Mushrif News update : मुश्रीफ यांच्या तीन मुलांना विशेष पीएमएलए न्यायालयाने 4 मेपर्यंत ईडीच्या कारवाईपासून दिलेले संरक्षण कायम ठेवले.
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama

Hasan Mushrif News update : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत, ईडीच्या चौकशीनंतर कोल्हापूर जिल्हा बॅंकेची नाबार्डकडून चौकशी करण्यात आली आहे. ईडीने तपासलेले मुद्दे नाबार्डच्या तपासणीत केंद्रस्थानी आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हसन मुश्रीफ संचालक असलेल्या संताजी घोरपडे साखर कारखाना, ब्रिक्स कंपनीला बेकायदेशीर कर्ज पुरवठा केल्याचा त्यांच्यावर ईडीचा आक्षेप घेतला आहे. जिल्हा बँकेत तीन दिवस तपासणी करून नाबार्डचे अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत. ईडीने नोंदवले आक्षेप व न्यायालयात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नाबार्डची तपासणी महत्वपूर्ण मानली जाते आहे.

Hasan Mushrif
BJP News : राऊतांबाबत भाजपचा मोठा निर्णय ; नितेश राणेंवर मोठी जबाबदारी ; ठाकरेंची अनेक गुपितं उघडणार..?

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांना विशेष पीएमएलए न्यायालयाने 4 मेपर्यंत ईडीच्या कारवाईपासून दिलेले संरक्षण कायम ठेवले.

पुढील सुनावणीपर्यंत ईडीने मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांवर अटक व अन्य कारवाई करू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मुश्रीफ यांचे कथित सी.ए. महेश गुरवच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निर्णयाची सुनावणीही 4 मेपर्यंत पुढे ढकलली आहे.

Hasan Mushrif
Karnatak Election 2023 : धर्माच्या आधारित आरक्षण देणं संविधानाच्या विरोधात : योगी आदित्यनाथ

भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर गेल्या काही महिन्यांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. सहकारी कारखान्यासाठी पैसे गोळा करुन ते वैयक्तिक कामासाठी वापरल्याचा ठपका मुश्रीफांवर ठेवण्यात आला. कारखान्यासाठी प्रलोभने दाखवून शेअर्स गोळा करत फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

या माध्यमातून हसन मुश्रीफ यांनी ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.याबाबात मुरगुड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com