हसन मुश्रीफ-घाटगे वाद पेटला... राष्ट्रवादीचे मोर्चा काढून उत्तर

Hasan Mushrif : ‘हसन मुश्रीफ आगे बढो...’ आदी घोषणांनी परिसर दणाणला.
Hasan Mushrif, Samarjeet Ghatge Latest News
Hasan Mushrif, Samarjeet Ghatge Latest Newssarkarnama

गडहिंग्लज : भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची जाणीवपूर्वक बदनामी करीत जातीयवाद पसरविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आज (ता.१० ऑगस्ट) निषेध मोर्चा काढला. दसरा चौकातून लक्ष्मी मंदिरापर्यंत पावसात हा मोर्चा निघाला. तत्पूर्वी, दसरा चौकात निदर्शने करण्यात आली होती. (Hasan Mushrif, Samarjeet Ghatge Latest News)

Hasan Mushrif, Samarjeet Ghatge Latest News
महाराष्ट्रातून देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून तुम्हाला पाहतोय साहेब..शिक्रापूरात फडणवीसांना औक्षण..!

सायंकाळी पाचच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दसरा चौकात जमले. समरजित घाटगे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘हसन मुश्रीफ आगे बढो...’ आदी घोषणांनी परिसर दणाणला. घाटगेंच्या निषेधाचे फलकही उभारले होते. दसरा चौकातून निषेध मोर्चाला सुरवात झाली. मुख्य मार्ग, लक्ष्मी रोडवरून मोर्चा लक्ष्मी मंदिराजवळ आला. या ठिकाणी मोर्चाची सांगता झाली.

Hasan Mushrif, Samarjeet Ghatge Latest News
अजितदादांसह तीन नेत्यांनी समजाविले... आता तरी राजन पाटील राष्ट्रवादीत राहणार?

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, उदय जोशी, किरण कदम, रामगोंड ऊर्फ गुंडू पाटील, महेश सलवादे, हरुण सय्यद, तुषार पाटील, सदानंद पाटील, पृथ्वीराज पाटील, राहुल शिरकोळे, नेताजी पाटील, बंटी पाटील, संग्राम पाटील, प्रकाश माने, शारदा आजरी, रेश्मा कांबळे, शर्मिला पोतदार, ऊर्मिला जोशी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com