Patan : गोळीबार प्रकरणावरुन अजित पवार संतापले...म्हणाले, मोगलाई लागून गेली आहे का...

Ajit Pawar पाटण गोळीबाराचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

Maharashtra Assembly Session : मुलाचा अपघात होऊन भांडणे झाली म्हणून गोळीबार करावा. ही काय मोगलाई लागून गेली आहे का, असे ठणकावत पाटण गोळीबार प्रकरणात मृत्यू झालेल्यांमधील एकजण मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai याच्या जवळाचा कार्यकर्त्याचा समावेश आहे. या प्रकारामुळे मोरणा खोरे व गुरेघर परिसरतील स्थानिकांत भितीचे वातावरण आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकारने चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार Ajit Pawar यांनी अधिवेशनात केली.

पाटण गोळीबाराचे विधीमंडळाच्या अधिवेशनात पडसाद उमटले. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करुन भांडणे झाली म्हणून गोळीबार करावा, मोगलाई लागली आहे का, असा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. अधिवेशनात मुद्दा मांडताना अजित पवार म्हणाले, मदन कदम या व्यक्तीने केलेल्या गोळीबारात दोन व्यक्तींचा जागेवर मृत्यू झाला आहे. आणखी एकजण गंभीर जखमी आहे.

मोरणा खोऱ्यांतील गुरेघर धरण परिसरात मदन कदम हा वास्तव्यास आहे. ठाणे महानगरपालिकेचा माजी नगरसेवक असून सातारा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. त्यांच्या मुलाचा अपघात झाला होता. त्यावेळी स्थानिकांशी त्यांची बाचाबाची झाली होती. त्यानंतर सोसायटी निवडणूक व पवनचक्की पेमेंटचाही या प्रकरणाला रंग आहे.

Ajit Pawar
Patan : पाटणला गोळीबारात दोघांचा मृत्यू; शिवसेनेचा माजी पदाधिकारी ताब्यात

मुख्यमंत्री या जिल्ह्याचे आहेत. ठाणे विधानसभेचे ते प्रतिनिधीत्व करतात. पाटणला शंभूराज देसाई प्रतिनिधीत्व करतात. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या घटनेत शंभूराज देसाई यांच्या जवळचा कार्यकर्त मृत्यूमुखी पडला आहे. मोरणा खोरे व गुरेघर परिसरात स्थानिका भितीचे वातावरण आहे.

Ajit Pawar
Satara : बाजार समिती निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे गट भिडणार

मुलाचा अपघात झाल्याने भांडणे झाली म्हणून गोळीबार करावा का. ही मोगलाई लागून गेली आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करुन कदम आणि त्यांची दोन मुले यांना अटक झाली असली तरी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत सरकारने चौकशी केली पाहिजे. तसेच कारवाई झाली पाहिजे. अध्यक्षांनी याबाबत सरकारला सूचना करावी.

Ajit Pawar
Pune BJP News : भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी ‘या’ चार जणांमध्ये होणार चुरस !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com