हर्षवर्धन पाटलांशी संबंधित कारखान्याची शेतकऱ्याकडून एफआरपीसाठी तोडफोड

बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे या गावच्या हद्दीत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित इंद्रेश्वर साखर कारखाना आहे.
Indreshwar Sugar Factory
Indreshwar Sugar FactorySarkarnama

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्याशी संबंधित असलेल्या बार्शी (Barshi) तालुक्यातील इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. गाळप झालेल्या उसाची एफआरपी (FRP) अद्याप न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे. (Harshvardhan Patil related Sugar factory vandalized by farmers for FRP)

बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे या गावच्या हद्दीत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित इंद्रेश्वर साखर कारखाना आहे. या कारखान्याने गाळप केलेल्या उसाची एफआरपी पाच महिने उलटूनही अद्याप देण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्या संयमाचा कडेलोट झाला. त्यातून ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.

Indreshwar Sugar Factory
छगन भुजबळांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी हात जोडले!

उसाची एफआरपी मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली उपळाई ठोंगे या गावातील इंद्रेश्वर शुगर मिलला टाळे ठोकण्यासाठी शेतकरी गेटवर आंदोलन करत होते. त्यातील एका संतप्त शेतकऱ्याने थेट इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे. संबंधित शेतकऱ्याने कार्यालयातील काचेच्या दरवाजाची तोडफोड करत एफआरपी न देण्याचा रोष व्यक्त केला.

Indreshwar Sugar Factory
‘आम्ही दुष्काळात जन्मलो असलो, तरी दुष्काळात आम्हाला मरू देऊ नका'

इंद्रेश्वर साखर कारखान्याने मागील पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीची रक्कम न दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज कारखान्याच्या गेटवरच टाळे ठोको आंदोलनासाठी ठिय्या मांडला होता. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यातील एका शेतकऱ्याने कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com