Harshawardhan Patil : सहकाराला सरकारचा राजाश्रय व वरदहस्त हवाच

सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या ४८ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ हर्षवर्धन पाटील ( Harshawardhan Patil ) यांच्या हस्ते आज झाला.
Harshawardhan Patil, Rahul Jagtap, Anuradha Nagawade, Rajendra Nagawade
Harshawardhan Patil, Rahul Jagtap, Anuradha Nagawade, Rajendra NagawadeSarkarnama

Harshawardhan Patil : राज्यभरात साखर कारखान्यांनी सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधण्याचे काम केले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत खासगी साखर कारखान्यांचे अतिक्रमण वरचढ होत आहे. सहकारी साखर कारखानदारी वाचविण्यासाठी सरकार कुठलेही असो, मात्र त्या सरकारचा राजाश्रय व वरदहस्त या चळवळीला हवाच, असे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील ( Harshawardhan Patil ) यांनी आज व्यक्त केले.

सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या ४८ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ पाटील यांच्या हस्ते आज झाला. कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, काष्टी सेवा संस्थेचे अध्यक्ष राकेश पाचपुते, अनिल पाचपुते, प्रशांत दरेकर, शुभांगी जंगले, धनसिंग भोईटे, दिनकर पंधरकर, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सचिव बापूराव नागवडे उपस्थित होते.

Harshawardhan Patil, Rahul Jagtap, Anuradha Nagawade, Rajendra Nagawade
सुना संपविणार नागवडे कुटुंबाचा राजकीय सासुरवास..

पाटील म्हणाले, की सहकार चळवळीची आता खासगीशी स्पर्धा आहे. कारखानदारीत नवीन प्रयोग येत आहेत. केवळ साखर उत्पादन ही बाब जुनी झाली असून आता इथेनॉल, आसवनी प्रकल्प शेतकऱ्यांना जास्तीचा दर देण्यासाठी उपयोगी ठरत आहे. नागवडे कारखान्यातही तेच असून कारखाना अतिशय चांगला सुरु असल्याचे बॅलन्स सीट सांगते. सहकारी साखर कारखानदारीत उगीचच राजकारण करीत विरोधाला विरोध करणे योग्य नाही. सहकाराला राजाश्रय असल्याशिवाय सहकार चालूच शकत नाही. सहकारी साखर कारखान्यांसाठी केंद्र व राज्यातील सरकार चांगले निर्णय घेत असून नागवडे कारखान्यानेही त्याचा उपयोग करून घ्यावा. कुठे फाइल अडली तर आपण आहोत अशी ग्वाही पाटील यांनी दिली.

राजेंद्र नागवडे म्हणाले, की कारखाना सुस्थितीत सुरू आहे. सभासद वाढविणारा नागवडे कारखाना राज्यातील एकमेव आहे. या वर्षी कारखान्याने १० लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. मागील वर्षीची उर्वरित पेमेंट १५ तारखेपर्यंत बँकेत वर्ग करू. सुभाष शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

Harshawardhan Patil, Rahul Jagtap, Anuradha Nagawade, Rajendra Nagawade
राजेंद्र नागवडे पुन्हा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष

जे आम्हाला जमले नाही, ते नागवडेंनी करून दाखविले

शिवाजीराव बापूंच्या निधनानंतरच्या निवडणुकीत सभासदांनी राजेंद्र नागवडे यांच्यावर विश्वास दाखविला, ही निश्चित शेतकरीहिताची बाब असल्याचे सांगत, त्यांच्या नेतृत्वात कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. राज्यातील पहिला खासगी तत्त्वावरील गॅस प्रकल्प कारखाना हाती घेत आहे. जे आम्हाला जमले नाही, ते राजेंद्र नागवडे करून दाखवीत असल्याची शाबासकीची थापही पाटील यांनी त्यांच्या पाठीवर मारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com