Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंवर शाईफेक ; सोलापुरात संभाजी ब्रिगेडचा पत्रकार परिषदेत राडा

Gunaratna Sadavarte : सोमनाथ राऊत असे शाईफेक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे
Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavartesarkarnama

Gunaratna Sadavarte : स्वतंत्र्य मराठवाड्याच्या मागणीसाठी पत्रकार परिषद घेत असताना गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना आज (शनिवारी) सोलापुरात घडली.

पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्याने काही काळ तणाव होता. सोमनाथ राऊत असे शाईफेक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. (Gunaratna Sadavarte latest news)

सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीविरोधात संभाजी ब्रिगेडने आक्रमक झाली आहे. सदावर्ते हे आज सोलापुरात या मागणीसाठी पत्रकार परिषद घेत होते.

Gunaratna Sadavarte
Uday Samant : शिंदे गुवाहाटीवरुन परतल्यावर ठाकरे गटाला आणखी खिंडार पडणार ? ; सामंतांचे सूचक विधान

पत्रकार परिषदेत सुरु असताना त्यांच्यामागे असणाऱ्या एका व्यक्तीने घोषणा देत त्यांच्यावर शाई फेकली. त्यांना काळे कापड दाखवून निषेध केला. याप्रकरणी सोमनाथ राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राऊत हे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत. "मला हत्येची धमकी दिली," असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.

अजित पवार हे माफी मागणार का?"

"आम्ही अशा लोकांना घाबरत नाही. या लोकांना आम्ही उत्तर देऊ. महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सांगेन राज्यात असंवैधानिक वागण्याची आधीच खबरदारी घेतली पाहिजे. परंतु याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार हे माफी मागणार का?" असा सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे. यावेळी सदावर्तेंनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली.

सदावर्ते म्हणजे भाजपचं पिल्लू : राऊत

सोमनाथ राऊत म्हणाले, "सदावर्ते हे महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. या महाराष्ट्रातला एक कार्यकर्ता म्हणून या गुणरत्न नव्हे तर गुणउधळे सदावर्तेचा मी निषेध करतो. सदावर्ते यांना महाराष्ट्रात कुठेही फिरु देणार नाही," "सदावर्ते म्हणजे भाजपचं पिल्लू आहे. महाराष्ट्र तोडायचा असं भाजपने ठरवलेलं आहे. पण आम्ही ते शक्य होऊ देणार नाही," असे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com