सदावर्ते आर्थर रोड कारागृहात; उद्या सातारा पोलिसांच्या ताब्यात मिळणार...

सदावर्तेंना साताऱ्यातील Satara एका गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी सातारा शहरचे Satara City police station पोलिस निरिक्षक PI भगवान निंबाळकर Bhagwan Nimbalkar व त्यांची टिम मुंबईत Mumbai जाऊन ठाण मांडून बसली आहे.
Gunratna Sadavarte
Gunratna Sadavartesarkarnama

सातारा : सातारा शहर पोलिसात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत ठाण मांडुन आहेत. आज सदावर्ते यांचा ताबा मिळेल अशी अपेक्षा पोलिसांना होती, मात्र न्यायालयीन आदेशानुसार सदावर्ते यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात झाली. येथून सदावर्ते यांना सातारा पोलिस गुरुवारी ताब्यात घेतील असे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते सध्या संशयित आरोपी म्हणून मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. अकरा तारखेच्या सुनावणीमध्ये त्यांना आणखी दोन दिवस दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांची कोठडीची मुदत संपणार असल्याने त्यांना मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले होते. आजच्या सुनावणीमध्ये त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Gunratna Sadavarte
Silver Oak Attack : ॲड. सदावर्ते यांना दीड तासाच्या चौकशीनंतर अटक; ‘ही’ लावली कलमे!

सदावर्ते यांच्याबाबत नवीन गोष्टी समोर येत असल्याने त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र, पोलिस तपासात नवीन काही नसून पोलिस तपास भरकटवला जात असल्याचे सदावर्तेंच्या वकिलांनी बाजू मांडली होती. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकुन घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ॲड. सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी एका वृत्तवाहिनीवर तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

Gunratna Sadavarte
सदावर्तेंना आता विविध ठिकाणी फिरवणार? ताब्यात घेण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत

सदावर्ते यांच्याबाबत नवीन गोष्टी समोर येत असल्याने त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र, पोलिस तपासात नवीन काही नसून पोलिस तपास भरकटवला जात असल्याचे सदावर्तेंच्या वकिलांनी बाजू मांडली होती. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकुन घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Gunratna Sadavarte
शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा : सातारा-जावलीतील अतिवृष्टीबाधित रस्ते, पूलांसाठी २५ कोटी

ॲड. सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी एका वृत्तवाहिनीवर तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दोन वर्षापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती. सदावर्तेंना या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी सातारा शहरचे पोलिस निरिक्षक भगवान निंबाळकर व त्यांची टिम मुंबईत जाऊन ठाण मांडून बसली होती. आज सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांचा ताबा सातारा पोलिसांनी मिळेल अशी शक्यता होती, मात्र तसे झाले नाही. सदावर्ते सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून त्यांचा ताबा घेण्यासाठी गेलेले सातारा पोलिस ताब्यासाठी न्यायालयीन आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com